Viral Video: हल्ली सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगू शकत नाही. दररोज सतत विविध विषयांवर आधारित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. ज्यात अनेक रील्स, गाणी, रेसिपी, आरोग्य सल्ले, विनोदी व्हिडीओ अशा विविध गोष्टी असतात. पण, या सर्व गोष्टी ठरवून शूट करून शेअर केल्या जातात. पण, अनेकदा सोशल मीडियावर प्राण्यांचे काही मजेशीर व्हिडीओदेखील पाहायला मिळतात, जे नकळत शूट केले असतात. सध्या असाच एका रस्त्यावरील भटक्या श्वानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तो असं काहीतरी करतोय जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक गल्लीमध्ये एकाहून अधिक भटके श्वान असतात, ज्यांची दादागिरी संपूर्ण परिसरात असते. अनोळखी लोकांवर त्यांची करडी नजर असते, त्यामुळे अनेकदा श्वानांमुळे चोरदेखील चोरी करण्यासाठी एखाद्या परिसरात जायला घाबरतात. अशाच एका दादागिरी करणाऱ्या श्वानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तो चक्क चालत्या रिक्षाच्या टपावर बसलेला दिसत आहे. पण, यावेळी तो अजिबात घाबरलेला नसून तो रिक्षाच्या टपावर थाटात बसलेला दिसत आहे.

व्हिडीओमध्ये काय घडलं? (Viral Video)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावरून चालणाऱ्या एका रिक्षाच्या टपावर एक श्वान आरामात बसलेला दिसत आहे. श्वानाचा हा थाट पाहून रस्त्यावरून चालणारे इतर लोकदेखील त्याच्याकडे पाहत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, ‘बनारस के गुरु’ असं लिहिलेलं आहे.

हा व्हिडीओ इन्टाग्रामवरील @hmmmdeepak या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर पन्नास हजारांहून लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

हेही वाचा: अरे व्वा! काय त्या स्टेप्स अन् काय ते हसू… चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलंय की, “वाराणसीचा बाहुबली”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “निवडणूक येत आहे म्हणून प्रचार करत असेल”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “भाऊ ब्रेक आरामात लाव, नाहीतर तो पडेल.” तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “हा आहे एरियाचा राजा”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the dog sat on the foot of the moving rickshaw after watching this video users also laughed sap