Viral Video: या जगात अनेक विषारी आणि भयानक प्राणी आहेत. त्यातील काही खूप दुर्मीळ असून, ज्यांना आपण कधी पाहिलेलेही नाही. पण, याच विषारी आणि भयानक प्राण्यांच्या यादीत सापाचाही समावेश आहे. साप म्हटले की नेहमीच अनेकांच्या अंगावर काटा येतो. सोशल मीडियामुळे सतत विविध प्राण्यांची माहिती, व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा सापाचेदेखील थरारक व्हिडीओ आपण पाहतो. अशातच आता सापाचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. सोशल मीडियावर सापांचे विविध व्हिडीओ सातत्याने व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. त्यात कधी साप घराच्या टॉयलेटमध्ये शिरलेला दिसला होता; तर आणखी एका व्हिडीओमध्ये साप लहान मुलाच्या पाळण्यात शिरताना दिसला होता. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये साप एका घरामध्ये शिरलेल्याचे दिसत आहे. पण यावेळी घरातील चिमुकली सापाला पाहते आणि असे काहीतरी करते; जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हेही वाचा: ‘गुलाबी साडी’ गाण्यावर साऊथ इंडियन लूकमध्ये तरुणांचा हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक पाहा व्हिडीओ: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरात साप शिरला असून, तो घरातील टेबलाखाली असल्याचे दिसत आहे. यावेळी एक लहान मुलगी सापाला पाहून न घाबरता, थेट त्याची शेपूट पकडते आणि त्याला खेचून त्याला घराबाहेर घेऊन जाते. या चिमुकलीचे हे धाडस पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @gurbaxsingh_kahlon या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत १८ दशलक्षांहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून, त्यावर सहा लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय, "हे सगळं ठीक आहे; पण व्हिडीओ बनविणारा काय करत आहे." तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, "भारताची शेरनी." तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, "तिची आई मेकअप करण्यात बिझी आहे."