Viral Video: प्राण्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत येत असतात, ज्यात जंगलातील कधीही न पाहिलेले प्राण्यांचे थरारक व्हिडीओ, तर कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक भागवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राणी असो किंवा माणूस दोघांची आयुष्य जगण्याची पद्धत जरी वेगळी असली, तरीही या दोन्ही सजीवांमध्ये पोट भरणे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे; यासाठी ते आपआपल्या परीने प्रयत्न करताना दिसतात. आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसले असतील. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही अशीच एक घटना जंगलामध्ये पर्यटकांना पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही पर्यटक जीपमध्ये बसून जंगलामध्ये जंगल सफारी करण्यासाठी गेले असून यावेळी ते एका ठिकाणी जीप थांबवतात. त्यावेळी जीपजवळ एक श्वान येतो, श्वानाला आलेलं पाहून शिकारीच्या शोधात असलेला वाघ जंगलातून वाऱ्याच्या वेगाने धावत येतो आणि श्वानावर हल्ला करतो. जंगलातील पर्यटकांसमोर वाघ श्वानावर हल्ला करतो, हे पाहून पर्यटकही खूप घाबरतात.

हेही वाचा: “आई तुझ्या प्रेमाची सर कशालाच नाही…” अनोळखी लोकांजवळ जाणाऱ्या पिल्लाला हत्तीने अडवलं; VIDEO पाहून नेटकरीही भारावले

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @WildernessofIndia या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत जवळपास मिलियन्समध्ये व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत, शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “बापरे खूपच खतरनाक होतं हे”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “बिचारा श्वान, त्याला वाटलं पर्यटक त्याला वाचवतील”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “थरारक व्हिडीओ.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the tiger reached the dog through the crowd of tourists sap