Viral Video: समाजमाध्यमामुळे अनेक नवनवीन व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. यातील काही व्हिडीओ पाहून आपण हसतो, आपले मनोरंजन होते; तर काही व्हिडीओंमुळे आपण भावनिक होतो. सध्या असाच एक भावूक करणारा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात असं काहीतरी पाहायला मिळतंय जे पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू निश्चित असतो. कधी, कोणत्या क्षणी मरण येईल हे कोणीही सांगू शकत नाही. मग ती एखादी व्यक्ती असो किंवा प्राणी असो. आजपर्यंत आपण असे अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील, ज्यात नकळत अनेकांच्या मृत्यूच्या घटना कॅमेऱ्यात कैद झालेल्या तुम्ही पाहिल्या असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका प्राण्याला त्याचा मृत्यू जवळ आल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ एका जंगलातील असून या व्हिडीओमध्ये एक लांडगा एका ठिकाणी उभा असल्याचे दिसत आहे. यावेळी तो अचानक विचित्र हावभाव करताना दिसतो. यावेळी कोणीतरी त्याच्या जवळ येत असल्याचा भास त्याला होतो आणि तो दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पुढे पळत गेल्यानंतर अचानक तो जमिनीवर कोसळतो, तडफडतो आणि जागीच मरण पावतो. हा व्हिडीओ पाहून अनेक जण मरण येणार असल्याची चाहूल सर्वांना लागते, असं म्हणत आहेत; तर काही जण लांडग्याची प्रकृती ठीक नसल्याचे म्हणताना दिसत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील एका @shetkari_brand_rg या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत.

हेही वाचा: ‘असा अंत कधी पाहिला नसेल…’ गोठ्यातल्या गाईने घेतला दुसऱ्या गाईचा जीव; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

पाहा व्हिडीओ:

तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “व्हिडीओ करण्यापेक्षा त्या मुक्या जीवाला थोडं पाणी दिलं असतं तर जीव वाचला असता त्याचा.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “त्याला विषबाधा झाली आहे, त्यामुळे तसं करतोय तो.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “माझी मांजरपण असंच करत होती.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the wolf suddenly panics and runs away netizens were shocked after seeing the video sap