Viral Video: समाजमाध्यमांवर लहान मुलांचे अनेक व्हायरल व्हिडीओ आपण पाहतो. यातील काही व्हिडीओंमध्ये लहान मुलं अभिनय करताना दिसतात तर कधी डान्स, गाणी अशा विविध कला सादर करताना दिसतात. यातील काही सुंदर व्हिडीओ क्षणार्धात लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळवतात. सध्या असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे, जो पाहून अनेक जण कौतुक करताना दिसत आहेत.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘एक नंबर तुझी कंबर’ या मराठमोळ्या गाण्यानेही समाजमाध्यमांवर अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक मराठी, हिंदी, परदेशी कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या आहेत. अशातच आता या गाण्यावरील चिमुकल्यांचा डान्स व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा आणि मुलगी‘एक नंबर तुझी कंबर’ या मराठमोळ्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स लक्ष वेधून घेत आहे. त्यांचा डान्सचे युजर्सही खूप कौतुकही केले जात आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vidhit.rawat या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “किती छान नाचली ही दोघं”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “क्यूटी खूप छान.” तिसऱ्याने लिहिलेय, “कमाल एक्स्प्रेशन्स आणि कमाल डान्स”. तसेच आणखी अनेक युजर्सही चिमुकल्यांचे कौतुक करताना दिसत आहेत.