Viral Video: हल्ली सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स, तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता दोन महिलांचा मराठी गाण्यावरील डान्स व्हायरल होत आहे.
समाजमाध्यमांवर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. सध्या सोशल मीडियावर ‘एक नंबर तुझी कंबर’, हे गाणं खूप चर्चेत आहे. आता या गाण्यावर दोन महिला खूप छान डान्स करताना दिसत आहेत.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन महिला ‘एक नंबर तुझी कंबर’, या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ch.anda709 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत तीन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि ३३ हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने लिहिलेय, “अतिशय उत्तम” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप छान डान्स” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “आईशप्पथ! खूप मस्त डान्स” आणखी एकाने लिहिलेय,, “खरंच जबरदस्त डान्स.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video two women dance in ek number tuzi kamber video viral on social media sap