Viral Video: राज्यभरात सर्वात मोठा मानला जाणारा गणेशोत्सव नुकताच संपन्न झाला. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर हा अकरा दिवसांचा काळ बाप्पाच्या सहवासात कसा गेला हे कळलेच नाही. मनावर दगड ठेऊन अनंत चतुर्दशीला राज्यभरातील घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या मूर्त्यांचे विसर्जन झाले. परंतु, सोशल मीडियावर अजूनही बाप्पांच्या सुंदर मूर्त्यांचे आणि विसर्जनाचे अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत, ज्यात काही जण बाप्पाच्या गाण्यावर डान्स करताना तर काही जण बाप्पासाठी बनवल्या जाणाऱ्या विविध पदार्थांच्या रेसिपीचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.

यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाचे अनेक वर्षांपूर्वी ‘अशी चिक मोत्याची माळ’ हे गाणं पुन्हा एकदा खूप चर्चेत आलं. या गाण्यावर जवळपास लाखो युजर्सनी घरातील बाप्पासमोर रील्स बनवले. त्यातील काही मोजके रील्स सोशल मीडियावर खूप चर्चेतही आले. आता अशाच एक बाप्पाच्या विसर्जनादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भररस्त्यामध्ये गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू असून यावेळी एक महिला तिच्या मुलीसह “अशी चिक मोत्याची माळ” या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसतेय. त्यांचा सुंदर डान्स आणि चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्स खूपच कमालीचे आहेत. त्यांचा हा डान्स पाहण्यासाठी आसपास अनेक लोक जमले असून काही जण त्यांचे फोटो आणि व्हिडीओदेखील काढत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @jiyamore.mjm या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत २ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “व्वा, दोघीही कमाल नाचल्या.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “याला बोलतात डान्स.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “एकच नंबर नाचल्या या दोघी.”