Daughter In Law Surprises Her Mother In Law With Special Gift : सासू आणि सूनेमध्ये चांगले संबंध आहेत असं फार क्वचितच पाहायला मिळते. दोघीही आपापल्या परीने घर सांभाळायला जातात आणि अनेकदा त्यांच्यात वाद होताना दिसतात. या दोघी कधी मैत्रिणी, तर कधी मायलेकी, तर कधी एकमेकींच्या शत्रूही असतात. कधी भांडतात, कधी रुसतात तर कधी एकमेकींना मदतही करतात, कधी दोघीही बरोबर, तर कधी दोघी चुकीच्या असतात. तर आज सोशल मीडियावर या नात्याचे अनोखे रूप पाहायला मिळाले आहे; जे पाहून प्रत्येकाला अशी सून मिळावी असेच वाटेल.
कोमल नावाची डिजिटल क्रिएटर @candidmaa नाव असणारे इन्स्टाग्राम चॅनेल चालवते. तिला दोन मुलं सुद्धा आहेत. तर यादरम्यान तिच्या कामात कोणताही अडथळा न येण्यासाठी तिची सासू भावनिक आणि व्यावहारिकदृष्ट्या तिला प्रचंड पाठिंबा देते. एखादी महत्वाची गोस्ट असली की, मुलाविरुद्ध सुनेच्या बाजूने उभी असते. आईकडे राहण्यासाठी किंवा फिरायला राहण्यासाठी कधीही रोखठोक करत नाही. पालकत्व असो, करिअर असो किंवा सामाजिक जीवन कोणत्याही बाबतीत आवडी-निवडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही.
प्रत्येकाला अशीच सासू मिळावी (Viral Video)
त्याचप्रमाणे @candidmaa साठी उशिरापर्यंत जाग राहून रील अपलोड करताना चहा सुद्धा आणून देते. तर हे सगळं लक्षात ठेवून थँक यू म्हणण्यासाठी सून सासूसाठी काहीतरी खास करते. सून लेकीच्या हातून सासूकडे गिफ्ट देते. गिफ्टचा बॉक्स उघडताच त्यामध्ये आयफोन असतो. आपल्यासाठी सुनेनं आयफोन घेतला या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नाही. सासूचे रिॲक्शन पाहून सून सुद्धा भारावून जाते. सासू-सुनेचा हा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @candidmaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये सुनेनं सासूचे भरभरून कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे व्हिडीओ पाहून नेटकरी भारावून गेले आहेत आणि “स्क्रोल करता करता कदाचित स्वप्नाळू दुनियेत आली”, “मला पण भविष्यात तुझ्या सासूसारखं व्हायचं आहे. प्रत्येकाला अशीच सासू मिळावी स प्रत्येक मुलीचं स्वप्न असेल. किती गोड व्हिडीओ” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
