Karwa Chauth Viral Video: हिंदू धर्मामध्ये अनेक व्रतवैकल्ये केली जातात, ज्यातील काही व्रत महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. महाराष्ट्रात ज्येष्ठ महिन्यामध्ये वटपौर्णिमा साजरी केली जाते. त्याचप्रमाणे दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यांसारख्या काही राज्यांमध्ये करवा चौथचे व्रत केले जाते. हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. या दिवशी महिला अन्न किंवा पाण्याशिवाय उपवास करतात आणि रात्री चंद्राची पूजा करून आपल्या पतीच्या हाताने पाणी पिऊन तो सोडतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी करवा चौथ पार पडले, ज्याचे विविध फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक महिला चंद्राची पूजा करताना असं काहीतरी करतेय जे पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करवा चौथच्या दिवशी महिला आपल्या पतीची चंद्रासह पूजा करून त्याच्या पाया पडतात. पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात. सर्वसामान्य महिलांपासून ते अनेक मोठ मोठ्या अभिनेत्रींपर्यंत अनेक जण या दिवशी हे व्रत करताना दिसतात. त्यांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहतो. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील महिला चक्क पतीच्या गुडघ्यावर उभी राहून त्याचे औक्षण करताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, करवा चौथचे व्रत सोडण्यासाठी घराच्या टेरेसवर गेलेले पती-पत्नी एक कधीही न पाहिलेला आगळा वेगळा स्टंट करताना दिसत आहेत. यावेळी पत्नी पतीला ओवाळण्याआधी हातात औक्षणाचे ताट घेऊन पतीच्या खांद्यावर उभी राहते आणि दुसरा पाय त्याच्या मानेवर ठेऊन चंद्राला पाहते, नंतर पतीचा चेहरा पाहून त्याला पाणी पाजून ओवाळते. या व्हिडीओतील महिलेचा बॅलन्स पाहून अनेक जण तिचं कौतुक करत आहेत, तर काही जण तिला ट्रोल करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘काय ते एक्स्प्रेशन्स अन् काय ते ठुमके…’, ‘अंबर सरिया’ गाण्यावर चिमुकलीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shalugymnast या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास १२४ मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “हिंदू संस्कृतीत असं कधीच होत नाही”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “अशा लोकांमुळे भारतीय संस्कृती आणि सणांची बदनामी होते.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “लाज वाटू द्या जरा”; तर आणखी अनेक युजर्स त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video women making karwa chauth special reel netizens expressed anger after seeing the these stunt sap