Viral Video: हल्ली आपली कला सादर करण्यासाठी लोक सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. डान्स, गाणी, अभिनय, पेंटिंग, रेसिपी, कविता अशा विविध कलाकृती लोक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून जगासमोर आणतात. त्याचील काही लोकांचे व्हिडीओ जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचतात ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळतो. सध्या अशाच एका तरूणीचा डान्स सोशल मीडियावर इतका व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.

सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. सध्या सोशल मीडियावर संजू राठोडचं ‘सुंदरी सुंदरी’ हे गाणं खूप चर्चेत आहे, ज्याच्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरूणीने सुंदर कोळी पद्धतीची साडी नेसली असून हातात बांगड्या, नाकात नथही घातलेली आहे. तिचा सुंदर डान्स अन् मनमोहक अदा पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत. तिच्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाल्या आहेत.

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @isha__malviya या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून याव्हिडीओवर आतापर्यंत ११ मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलंय की, “क्या बात है सुंदरी”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “ही सुंदरी नाही अप्सरा आहे”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “सुंदरी खूपच खतरनाक”