Bihar Leaders Watch Porn In Sawan: जन अधिकार पक्षप्रमुख पप्पू यादव यांनी भाजप नेते, राज्यसभा खासदार आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बिहारमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना पप्पू यादव यांनी भाजप नेत्यावर हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पप्पू यादव यांनी सुशील कुमार मोदी पॉर्न पाहतात, असा गंभीर दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्रकाराने जनाधिकारी पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांना विचारले की, भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी आरोप केला आहे, बिहारमधील लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व नेते श्रावण महिन्यात मांसाहार करतात, हे खरं आहे का? श्रावण महिना हा पवित्र मास म्हणून ओळखला जातो आणि तरीही श्रावण महिन्यात सर्व नेते हिंदुच्या भावनांच्या विरुद्ध काम करतात, असेही भाजपने म्हटले आहे, असे या वार्ताहराने सांगितले. यावर पप्पू यादव यांनी दिलेलं उत्तर सर्वांच्या भुवया उंचावत आहे.

पत्रकाराचा प्रश्न ऐकून पप्पू यादव भडकूनच म्हणाले की, “श्रावणात मांसाहार वगळणे म्हणजे फक्त मांस आणि मासे खाणे बंद करणे एवढाच अर्थ होत नाही. पण श्रावण महिन्यात पॉर्न पाहणे देखील नॉनव्हेज आहे, श्रावण महिन्यात दारू पिणे हे देखील नॉनव्हेज आहे. बिहारमधील प्रत्येक नेत्याचे मोबाईल फोन तपासा, कोण पॉर्न पाहतो आणि कोण पाहत नाही हे त्यांना कळेल. तिसरं-चौथं लग्न करणं, दुसऱ्या जातीला कमी लेखणं हे सगळंही नॉनव्हेजच आहे. या नेत्यांनी कोरोनाच्या वेळी किती पॉर्न पाहिले, श्रावणात किती पॉर्न पाहिले ते सगळं तपासा. सुशील मोदींनी स्वतःचाच फोन एकदा तपासून घ्या त्यातच कळेल किती पॉर्न बघतात..”

हे ही वाचा<< एका टूथब्रशने लालू प्रसाद यादव यांनी दाखवला ‘भारत’ व ‘इंडिया’तील फरक! विनाशर्ट कॅमेरासमोर येऊन…

राहुल गांधी आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव चंपारान मटण बनवत असल्याच्या व्हिडिओवर सुशील कुमार मोदींनी भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, “हिंदु आणि सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ गटाचा जन्म झाला आहे. यावरून पप्पू यादव यांनी सुशील मोदींचा मोबाईल तपासा बघा तुम्हाला त्यात पॉर्न सापडतं की नाही असं आव्हानही केलं आहे. मांसाहाराच्या नावाखाली हे लोक इतर समाजातील लोकांवर हल्ले करतात, त्यांनी देशात मांसाहाराच्या नावाने द्वेषही पसरवला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watching porn in shravan is nonveg pappu yadav jabs at bjp says check sushil modi phone you will see how much porn they watch svs