Rain water dripping train: दिल्ली मेट्रोप्रमाणेच भारतीय रेल्वेही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. भारतीय रेल्वेचे व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ट्रेनच्या डब्यांमध्ये नेहमीच विचित्र गोष्टी घडत असतात, मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. सध्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे; ज्यामुळे अनेक ठिकाणचे नद्या आणि तलाव दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी रस्ते, रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. त्याशिवाय विमानतळ, बसस्थानकांनाही नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोको पायलट छत्री धरून ट्रेन चालवतोय

अशात सोशल मीडियावर एका ट्रेनचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात ट्रेनच्या छताला गळती लागल्याने पावसाचे पाणी टपकताना दिसतेय. ट्रेनच्या डब्यांमध्ये पाणी गळताना तुम्ही पाहिलंच असेल, मात्र कधी लोको पायलटच्या केबिनमध्ये गळती झाल्याचं पाहिलंय का? नाही ना.. मात्र याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. लोको पायलटच्या केबिनमध्ये गळती सुरू असल्याचं दिसत असून यावेळी लोको पायलटला चक्क छत्री घेऊन ट्रेन चालवावी लागलीय. हा व्हिडीओ पाहून प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे.

पावसाळ्यात लोकांची घरे, झोपड्या गळताना तुम्ही पाहिल्या असतील, पण कधी ट्रेन गळती झालेली पाहिली आहे का? व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ट्रेनचे छत टपकत नसून वाहत आहे. चालत्या ट्रेनमध्ये लोको पायलट छत्री घेऊन बसलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये ट्रेन कशी वेगात धावत आहे आणि ट्रेनचे सनरूफ उघडे आहे हे दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ड्रायव्हर आपले कर्तव्य चोख बजावताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: मेट्रोमध्ये पुन्हा एकदा झाला राडा! तरुणीनं मारली थोबाडीत, पुढे तरुणानं काय केलं हे तुम्हीच पाहा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे, जो आतापर्यंत पाच लाख १२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी या व्हिडीओला लाइकही केले आहे. युजर्सच्या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रियाही येत आहेत. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. एकाने लिहिले की, “लोको पायलटवरच ही वेळ, तर सामान्य प्रवाशांचं काय?”

पण, हा व्हिडीओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water is dripping from the train engine so the loco pilot is running the train with an umbrella srk