Viral News On Social Media: आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आता तुम्हीच पाहा की, इथे एक कर्मचारी आणि त्याच्या बॉसचे व्हॉट्सॲपचे संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बर्‍याच कर्मचार्‍यांसाठी सर्वांत कठीण गोष्ट म्हणजे त्यांच्या बॉस किंवा मॅनेजरकडून रजा मंजूर केली जाणे. कारण- कर्मचाऱ्याचा रजेचा अर्ज पाहताच अनेक बॉसना डोकेदुखी होते. जवळ-जवळ प्रत्येक कर्मचारी आपल्या बॉसला कंटाळलेला असतो. तुम्हीही ऑफीसमधील कामाचे ओझे वाढले, मानसिक ताण आला की शक्यतो वरिष्ठांना किंवा बॉसला सांगून सुट्टी घ्याल, सुट्टी मिळाली नाहीच तर आजारी असल्याचे सांगून दांडी माराल. दरम्यान एका कर्मचाऱ्यानं आजोबा वारल्यामुळे सुट्टी मागितली होती. पण बॉसनं त्याला काय रिप्लाय दिलाय, ते पाहून खरंच तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. या संभाषणाचे चॅट आता व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

प्रत्येक ऑफिसचे वर्क कल्चर वेगळे असते. कामाच्या पद्धतीशिवाय कामाचा ताणही तितकाच जास्त असतो. दरम्यान, रजा मागणे सोपे नसते. तुम्ही जरी रजा मागितली तरी काही वेळा तुमच्या रजेचा अर्ज फेटाळला जातो. मात्र, आजारी असताना किंवा काही अचानक संकट आल्यावर तरी कंपनीने समजून घ्यावे, अशी प्रत्येक कर्मचाऱ्याची अपेक्षा असते. मात्र, या कंपनीने आजोबा वारल्याची माहिती दिल्यानंतरही तू आज वर्किंग राहा असा रिप्लाय केलाय.

या चॅटमध्ये तुम्ही पाहू शकता, या तरुणानं बॉससोबत झालेल्या संभाषणाचं वॉट्सॲप चॅट शेअर केलं आहे. त्यानं बॉसला आजोबा वारल्याची माहिती दिली आणि सुट्टी मागितली. सुरुवातीला बॉसनं औपचारिक सहानुभूती व्यक्त केली. पण लगेचच कामासाठी उपलब्ध राहण्याच्या सूचना दिल्या. बॉस म्हणाला, “तू सुट्टी घे. पण आम्ही काही क्लायंट्सचे ऑनबोर्डिंग करत आहोत. तू मदत कर. व्हॉट्सअ‍ॅपवर ॲक्टिव्ह राहा आणि गरज पडल्यास डिझाइनर्सना मदत कर.” तरुण म्हणतो, घरात मृत्यू झालेल्या परिस्थितीतही माझ्याकडून काम करून घेतलं जातंय.

पाहा चॅट

नेटकरीही संतापले

नेटकरी यावर संतापले असून, हा असा कसा नियम म्हणून या कंपनीवर टीका होत आहे. युजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.