Husband Funny Dance Video: नवरा-बायकोचं नातं कायमच वेगळं आणि हटके असतं. या नात्यामध्ये रूसवे, फुगवे, प्रेम आणि भांडणे नेहमीच होतात. त्यांच्यामध्ये जितके जास्त प्रेम असेल तितकी अधिक भांडणे होतात. लग्न, नवरा-बायको यांचे नाते आणि त्यावर आधारित विनोदी मीम्स हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. लग्न म्हणजे एक गोड बंधन असले तरी त्यावर आधारित मजेदार व्हिडीओ आणि जोक्स यांची सोशल मीडियावर भरमार असते. सध्या असाच एक भन्नाट आणि प्रचंड मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सोशल मीडियावर नवरा-बायकोच्या डान्सचे अनेक जबरदस्त आणि मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ प्रेक्षकांना हसवतात आणि लग्नाच्या नात्याच्या गमतीजमती दाखवतात. अनेकदा या व्हिडीओमध्ये नवरा किंवा बायको एकमेकांबरोबर मस्तीत डान्स करताना दिसतात, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांना प्रचंड पसंती मिळते. अशा व्हिडीओंमुळे नात्यांतील प्रेम आणि आनंद व्यक्त होतो, तसेच प्रेक्षकांनाही छान मनोरंजन मिळते. परंतु, आता एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात एक नवरा आपल्या बायकोच्या माहेरी जाण्याच्या आनंदात ठुमके लावताना दिसतो आहे.

या व्हिडीओमध्ये एक नवरा बायकोच्या माहेरी गेल्याच्या आनंदात बेधुंदपणे डान्स करताना दिसतो आहे. असं म्हटलं जातं की, लग्नानंतर नवऱ्याला जो सर्वात मोठा ‘शांततेचा क्षण’ मिळतो तो म्हणजे त्याची पत्नी काही दिवसांसाठी माहेरी जाते तेव्हा! यावर आधारित असंख्य विनोद आणि मीम्स आपण पाहिले आहेत. मात्र, या व्हिडीओने त्याला चारचांद लावले आहेत.

हा व्हिडीओ ‘indorigovindaa’ या इन्स्टाग्राम युजरने पोस्ट केला असून, त्यात ती व्यक्ती टॉवेल आणि बनियान घालून कधी जमिनीवर, तर कधी बेडवर उड्या मारत डान्स करताना दिसते. त्याचा आनंद इतका ओसंडून वाहतो आहे की पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटते.

येथे पाहा व्हिडीओ

व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट्समध्ये भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले, “तुमचे आयुष्य जगा भाऊ, फक्त काही दिवसांसाठी, मग तेच…” तर दुसऱ्याने म्हटले, “कोणी तरी हा व्हिडीओ त्याच्या बायकोला पाठवा, ती लगेच परत येईल!” तिसऱ्याने लिहिलं, “फक्त चार दिवसांची चांदणी आहे, नंतर अंधारी रात्र येणारच!”, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

या व्हिडीओला अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली असून, आतापर्यंत ६७ लाखांहून अधिक व्ह्युज आले आहेत आणि एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी या व्यक्तीचा डान्सही कमालच असल्याचं म्हटलं आहे.