Viral Video : सोशल मीडियावर अनेक पक्षी किंवा प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये कधी प्राणी पक्ष्यांमध्ये माणूसकी दिसून येते तर कधी प्रामाणिकपणा दिसून येतो. माणसांप्रमाणे बोलता न येणाऱ्या या प्राणी पक्षांना अनेक कला अवगत असतात. सध्या असाच एका चिमणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक एक गवत चोचीमध्ये आणून चिमणी घरटं साकारताना दिसत आहे. चिऊ ताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
निसर्गाने मानवाला भरभरुन दिले. आता माणूस मनाप्रमाणे जगतोय. इंजिनिअर्सच्या मदतीने स्वत:साठी सुंदर घरं बनवतोय. पण तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वोत्तम इंजिनिअर्स हे पक्षी आहेत. गवत, कापूस,पिसे किंवा मिळतील त्या वस्तूंचा वापर करुन झाडावर किंवा कुठेही मिळेल त्या जागेवर पक्षी घरटे बांधतात. विशेष म्हणजे ज्या मेहनतीने ते घरटे बांधतात, ते पाहून कोणीही थक्क होईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसून येईल की एक चिमणी तिच्या चोचीमध्ये गवत आणताना दिसत आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला दिसून येईल की ती घरटे बनवत आहे. चिऊ ताईची घरटे बनवतानाची ओढ पाहून कोणीही भारावून जाईल.
हेही वाचा : Optical Illusions : तुम्हाला फोटोमध्ये झाडावर हिरवी पाने दिसतात का? पण ही पाने नाहीत, एकदा क्लिक करून पाहा
nikhil_gamer2.0 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “न शिकलेली चिऊ ताई” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वाह!किती सुंदर व्हिडीओ आहे” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “संघर्ष हा सगळीकडे आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “यांची बरोबरी माणूस करू शकत नाही.” अनेक युजर्सनी व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.