Shocking video: सोशल मीडियाचे जग मजेदार फोटो आणि प्राण्यांच्या व्हिडिओंनी भरलेले आहे. ज्या लोकांना प्राण्यांची खूप आवड आहे, ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर बघण्यात घालवतात. असे लोक पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य मानतात आणि त्यांना सांभाळतात. तर असेही काही लोक आहेत जे या मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचा आनंद घेतात. असे लोक केवळ त्यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाहीत तर त्यांना विनाकारण त्रास देतात. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका तरुणानं क्रुरतेचा कळस गाठला आहे. यामध्ये एका तरुणानं बकरीचे कान चक्क दाताने तोडले आहेत. याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक प्राणी हे माणसांपेक्षा कमी बलवान असतात ज्यामुळे बऱ्याचदा माणसं आपल्या आनंदासाठी त्यांचा फायदा उचलू बघतात आणि त्यांना त्रास देऊ लागतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे झाल्याचे दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण रानात उभा आहे त्याच्या आजूबाजूला अनेक बकऱ्या दिसत आहेत. यावेळी तो एक बकरीला पकडतो आणि अक्षरश: तिचे कान स्वत:च्या दाताने तोडतो. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की किती क्रूरपणे तो त्या मुक्या जीवाला त्रास देत आहे. त्याने दोन्ही हातानं बकरीला पकडून आधी एक आणि नंतर एक असे दोन्ही कान दातानं तोडले आहेत.  हा व्हिडीओ माणुसकीला काळीमा फासणारा असून त्यामधून माणसांमधील रानटी रूप समोर आलं आहे. अत्याचार पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. शिवाय या घटनेच्या व्हिडीओने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे.

पाहा व्हिडीओ

या घटनेचा व्हिडिओ आता एकाने आपल्या कॅमेरात रेकॉर्ड केला असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच आता नेटकऱ्यांद्वारे यावर संताप व्यक्त केला जात आहे. याचा व्हिडिओ @shridhar_mijji_06 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर काहींनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “ही क्रूरता आहे”. तर आणखी एकानं “बापरे किती वेदना झाल्या असतील त्या जिवाला” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अनेक प्राणीप्रेमींनी केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man breaks goats ear with his teeth shocking video goes viral on social media srk