Viral Video: देशभरात अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे बऱ्याच शहरांना रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. मात्र, जोरदार पाऊस असूनही अनेक जण पावसाच्या दिवसात धबधब्यांवर भिजण्यासाठी जातात, मजामस्ती करताना दिसतात. अनेकदा पाण्याचा प्रवाह इतका असतो की, यामुळे काहींना आपला जीवदेखील गमवावा लागतो. मागील काही दिवसांपासून अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. या दरम्यानचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही दिवसांपासून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. पण, काही तरुण मंडळी पावसाच्या पाण्यात उतरून रील्स बनवताना दिसत आहेत; तर अनेक जण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीच्या पाण्यात उड्या मारत आहेत तर काही जण धबधब्यांवर जाऊन मजामस्ती करताना दिसत आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळतंय, जे पाहून अनेक जण संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गावातील ओढ्यामधील वाहत्या पाण्यात एक तरुण झाडाच्या ओंडक्यावर उभं राहून मौजमजा करताना दिसत आहे. पुढे तो वाहत्या पाण्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उडी मारतो. यावेळी काही जण त्या तरुणाचा व्हिडीओदेखील शूट करत असून तरुणाला प्रोत्साहन देत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vedant_official_220 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत नऊ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून तीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ बाप्पाची मूर्ती पाहून चिमुकलीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “आनंद गगनात हिच्या मावेना…”

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “बाहुबलीचा मोठा भाऊ”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “अंगातली मस्ती”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “पुढे जायला घाबरला”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “असाच एकदिवस जीव जाईल.”