वसई: वसईत अर्नाळा, अर्नाळा किल्ला व सायवन या ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले.सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरवात झाली. यामध्ये युवा मतदारांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनी वसईत सायंकाळ पर्यँत ६८.३१ टक्के मतदान झाले.रविवारी वसई तालुक्यातील मुदत संपलेल्या अर्नाळा, अर्नाळा किल्ला आणि सायवन तीन ग्रामपंचायतींची निवडणूक व आडणे भिणार, सकवार या दोन ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूकिसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली पडली एकूण ३८ जागा असून ३५ सदस्य तर ३ सरपंच पदासाठीच्या जागा आहेत. यासाठी ९८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.दिवाळीच्या पूर्व संध्येलाच मतदान असल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. सकाळ पासूनच मतदान केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी सत्रात दीड वाजेपर्यंत ४३ टक्के टक्के मतदान झाले होते. मात्र नंतर मतदार मोठय़ा संख्येने बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावल्याने दुपारी साडेतीन पर्यँत मतदानाची आकडेवारी ५५ टक्के इतकी होती. सकाळी अर्नाळा येथे मतदान यंत्र ( ईव्हीएम) बंद पडले होते. अर्धा ते एक तासानंतर पुन्हा सुरू करून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.
सायंकाळ पर्यँत वसईत ६८.३१ टक्के इतके मतदान झाले. मतदान केंद्राच्या ठिकाणी कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली होती. दिव्यांग व वयोवृद्ध मतदार यांची ने आण करण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून वसई तहसीलदार कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
