भाईंदर : अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या एका रिक्षावाल्याला नागरिकांनी चोप देऊन धिंड काढली. रविवारी संध्याकाळी मिरा रोडच्या काशिमिरा परिसरात ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित मुलगी १२ वर्षांची असून मिरा रोड परिसरात राहते. राजू वर्मा (३८) नावाचा रिक्षाचालक तिला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता. रविवार ५ जानेवरी रोजी संध्याकाळी ही मुलगी कामानिमित्ताने घराबाहेर गेली होती. त्यावेळी राजूने अश्लील इशारे करत तिला सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी खुणावले. मुलीने लगेचच तेथून पळ काढला आणि घरी येऊन हा प्रकार सांगितला. या भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते अजय साळवी यांनी रिक्षावाल्याला रंगेहाथ पकडण्यासाठी पीडित मुलीला पुन्हा त्याच रस्त्याने जाण्यास सांगितले आणि सापळा लावला. मुलीला परत आलेलं पाहून रिक्षाचालकाने पुन्हा अश्लील इशारा केला. ते पाहून उपस्थित नागरिकांना त्याला रंगेहाथ पकडून बेदम चोप दिला आणि अर्धनग्न धिंड काढत काशिमीरा पोलीस ठाण्यात नेले. या मारहाणीची चित्रफित सध्या व्हायरल झाली आहे.

हेही वाचा – मिरा रोड गोळीबार प्रकरणाचा छडा; व्यावासायिक वादातून भावा-बहिणींनी केली हत्या

हेही वाचा – नालासोपाऱ्यात परिवहन सेवेच्या भंगार बसला आग, तिसऱ्यांदा आग दुर्घटना

काशिमिरा पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक राजू वर्मा याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५ (२) तसेच बालकांचे लैंगिक अत्यारापासून संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. आम्ही आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhayandar a minor girl was molested by a rickshaw driver ssb