वसई- नालासोपारा येथे पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपी पतीला मध्यवर्ती गुन्हे शाखेन उत्तरप्रदेशातील उन्नाव येथून अटक केली आहे. मागील १५ वर्षापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. नालासोपारा येथील संतोष भुवन परिसरात राहणार्‍या रिहान (३५) नावाच्या महिलेने जवाद जब्बार सय्यद याच्याशी दुसरे लग्न केले होते. रिहान आणि सय्यद यांच्यात कौटुंबिक वाद होते. त्याच वादातून २४ मे २०११ रोजी सय्यद याने पत्नी रिहानाची डोक्यात दगड घालून हत्या केली होती. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात सय्यद विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सय्यद फरार झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या पोथकाने या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला. आरोपी हा उत्तर प्रदेशातील उन्नाव या मुूळ गावी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मागील एक महिन्यांपासून त्याचा शोध घेऊन सापळा लावून अटक करण्यात आली. १५ वर्षांनंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. मयत रिहाना हिला  तिला पहिल्या पतीपासून मुलगा होता. तो तिला भेटण्यासाठी येत होता. त्यातून पती-पत्नीत वाद झाला होता आणि त्याच वादातून तिची हत्या करण्यात आली होती., असे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपायु्क्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद बल्लाळ, मध्यवर्ती गुन्हे शाखेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, श्रीमंत जेधे, आसिफ मुल्ला आदींच्या पथकाने या आरोपीला पकडण्याची कारवाई केली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband absconding after killing wife in nalasopara arrested after 15 years zws