वसई: पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाकडे गेल्याने शिंदे गटाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झाल्याची शक्यता आहे. भाजपाने शुक्रवारी ११ वाजता अर्ज भरत असल्याचे जाहीर केले असून डॉ. हेमंत सावरा, विलास तरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर खासदार गावित यांनी मी अद्यापही रेसमध्ये असल्याचे सांगितले आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला पेच आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. पालघरची जागा महायुतीमधील भाजपाट्या वाट्याला गेली आहे. या मतदारसंघावर प्रबळ दावा असणार्‍या शिवेसना शिंदे गटाचे विद्यमान खासदार यांना त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या वाटेला जागा जाताच गुरुवारी भाजपाचे माजी आमदार विलास तरे, डॉ. हेमंत सावरा, संतोष जनाठे आणि प्रकाश निकम यांनी अर्ज घेतले आहे. उद्या ११ वाजता भाजपातर्फे अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रकाश निमक आणि संतोष जनाठे यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र विलास तरे किंवा डॉ. हेमंत सावरा यांच्यापैकी एक जणाला उमेदवारी दिली जाईल, असे भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष मनोज बारोट यांनी सांगितले.

हेही वाचा – सूर्या नदीत दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश

हेही वाचा – पाकिस्तान कैदेतून सुटका होणाऱ्या ३५ कैदींमध्ये डहाणू मधील पाच खलाशांचा समावेश

मी अद्यापही शर्यतीमध्ये

खासदार राजेंद्र गावित मात्र अद्याप आशावादी आहे. गावित यांनी देखील अर्ज घेतला आहे. वरच्या पातळीवरून चर्चा सुरू आहे. ती सकारात्मक होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मी अद्यापही शर्यतीमध्ये आहे. एक दिवस बाकी आहे. त्यामुळे काहीही होऊ शकते असे गावित यांनी सांगितले.