वसई : माणिकपूर पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे चर्चेत आलेला चावीविक्रेता मोहम्मद अन्सारी याच्यावर माणिकपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ग्राहक महिलेला अश्लील शिविगाळ केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मात्र मी यापूर्वी पोलिसांविरोधात तक्रार केल्याने मला नाहक खोट्या गुन्ह्यात गुंतविल्याचा आरोप चावी विक्रेता अन्सारी याने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसईच्या अंबाडी रोड येथील चावी विक्रेता मोहम्मद अन्सारी हा पुन्हा चर्चेत आला आहे. मे महिन्यात माणिकपूर पोलिसांनी क्षुल्लक वादामुळे त्याला मारहाण केली होती. त्याची दखल मानवाधिकार आयोगाने घेत अन्सारी याला ३ लाखांच्या नुकसान भरपाईचे आदेश दिले होते. आता याच अन्सारीवर एका महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी एक ५६ वर्षीय महिला आली. अन्सारी याने बनवलेली चावी निकृष्ट असल्याचे सांगून तिने वाद घातला. त्यामुळे घाबरून अन्सारी याने माणिकपूर पोलीस ठाण्यात त्या महिलेविरोधात अदखलातत्र गुन्हा दाखल केला. परंतु नंतर या महिलेने अन्सारी विरोधातच अश्लील शिविगाळ केल्याचे सांगत विनयभंगाची तक्रार दाखल केली.

हे ही वाचा… घोडबंदर किल्ला भाड्याने देणे आहे…मिरा-भाईंदर महापालिकेच्या ठरावामुळे वाद

पोलिसांची कारवाई सुडबुध्दीची

मी पोलिसांविरोधात तक्रार केल्यानेच मला नाहक या खोट्या गुन्ह्यात अडकविले असल्याचे अन्सारी याने सांगितले. महिला माझ्या दुकानात आली आणि मला शिवीगाळ केल्याने मीच आधी पोलीस ठाण्यात गेलो, असे अन्सारी याने सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सुशांत पवार यांनी हा प्रकार म्हणजे पोलिसांची सुडबुध्दी असल्याचा आरोप केला आहे. चावीविक्रेत्याने पोलिसांच्या दादागिरीविरोधात आवाज उठवला म्हणून एका महिलेला पुढे करून हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप पवार यांनी केला.

हे ही वाचा… भाईंदर : भाजप महिला जिल्हाध्यक्षाच्या भावावर गुन्हा दाखल, मिरा रोडमध्ये ५ लाखांची वीज चोरी

पोलिसांनी आरोप फेटाळले

पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. महिला तक्रारदार आमच्याकडे आली आणि तिने दिलेल्या फिर्यादीनुसार आम्ही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली.