विरारमध्ये गरबा खेळण्यावरून दोन गटातील वादात मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाची हत्या |plyaing garba Quarrel between two groups murder the youth virar | Loksatta

विरारमध्ये गरबा खेळण्यावरून दोन गटात वाद ; मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाची हत्या

बैजनाथ शर्मा भांडण सोडवू लागला असताना त्यालाच सात ते आठ जणांकडून लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली.

विरारमध्ये गरबा खेळण्यावरून दोन गटात वाद ; मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाची हत्या
विरारमध्ये गरबा खेळण्यावरून दोन गटात वाद ; मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाची हत्या

विरार : विरार मध्ये गरब्यात खेळण्यावरून दोन गटात भांडणे झाली. त्यात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणालाच मारहाण करण्यात आली. या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी विरार पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. .विरार पूर्वेच्या सहकार नगर परिसरात बिठूरमाळी कंपाऊंड येथे राहणारा केस कर्तनाचा व्यवसाय करणारा बैजनाथ शर्मा (२९) बुधवारी आपले दुकान बंद करून घरी गेला होता. यावेळी सोसायटीच्या गरब्यात भांडणे सुरू असल्याचे त्याला कळले आणि तो परत आला.

यावेळी दोन गटात गरबा खेळण्यावरून भांडण झाल्याचे त्याला समजले असता तो भांडण सोडवू लागला असताना त्यालाच सात ते आठ जणांनी लोखंडी सळईने मारहाण केली. यात शर्मा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल केले असता गुरूवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त जमावाने विरार पोलीस ठाण्यात गर्दी करत पोलिसांना घेराव घातला. या संदर्भात माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
परिवहन विभागाकडे महसुलाचे सोने ; सुमारे दोन हजार वाहनांची नोंद, पावणेआठ कोटींचा महसूल

संबंधित बातम्या

नायगाव उड्डाण पुलाचे शिवसेनेकडून बेकायदेशीर नामकरण; पोलीस आणि एमएमआरडीए बघ्याच्या भूमिकेत!
वादाच्या भोवऱ्यात ‘हिंदी भाषिक भवना’चे भूमिपूजन संपन्न; विरोध करणारे मराठी एकीकरण समितीचे १२ कार्यकर्ते ताब्यात

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘राज ठाकरे हेच खरे जातीयवादी’; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Dutee Chand Marriage: समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
इंडोनेशियात विवाहपूर्व शरीरसंबंध बेकायदा ठरणार, येतोय नवीन कायदा
जॉन्सन्सची बेबी टाल्कम पावडर वापरासाठी सुरक्षित; प्रयोगशाळांतील अहवातून स्पष्ट
मुंबई: नायर दंत रुग्णालयात उभारणार अद्ययावत प्रयोगशाळा