मनसेचे सरचिटणीस व माजी आमदार प्रवीण दरेकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मनसेमधून भाजपत प्रवेश करून घाटकोपर विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले राम कदम यांच्या माध्यमातून दरेकर हे भाजप नेत्यांच्या सपर्कात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे दरेकर यांचा मागठाणे विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. दरेकर यांच्याप्रमाणेच मनसेच्या सर्व माजी आमदारांचा पराभव झाला असून पक्षाने उभ्या केलेल्या २१९ उमेदवारांपैकी २०३ उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. आमदारांनी काम न केल्यामुळे मनसेचा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया मनसेचे बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केल्यानंतर नाराज झालेल्या दरेकर यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे पाठवून दिला. यानंतर दरेकर यांनी राम कदम यांच्या माध्यमातून भाजप नेत्यांच्या भेटीघाटी घेण्यास सुरुवात केली असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, याबाबत दरेकर यांच्याकडे विचारणा केली असता आपण अजूनही मनसेमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे दरेकर यांचा मागठाणे विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. दरेकर यांच्याप्रमाणेच मनसेच्या सर्व माजी आमदारांचा पराभव झाला असून पक्षाने उभ्या केलेल्या २१९ उमेदवारांपैकी २०३ उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. आमदारांनी काम न केल्यामुळे मनसेचा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया मनसेचे बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केल्यानंतर नाराज झालेल्या दरेकर यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे पाठवून दिला. यानंतर दरेकर यांनी राम कदम यांच्या माध्यमातून भाजप नेत्यांच्या भेटीघाटी घेण्यास सुरुवात केली असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, याबाबत दरेकर यांच्याकडे विचारणा केली असता आपण अजूनही मनसेमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin darekar on the way of bjp