जिल्ह्यात ९७ पकी ४१ घाटांचा लिलाव पूर्ण झाला, तर ३२ घाटांचा लिलाव न झाल्याने या घाटांच्या अपेक्षित किमती २५ टक्क्यांनी कपात करण्याच्या प्रस्तावास आयुक्त कार्यालयाने मान्यता दिली. त्यामुळे लवकरच या घाटांचा लिलाव होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ९७ वाळूघाटांचे लिलाव जाहीर झाले होते. परंतु यातील १५ घाट लिलावाच्या निकषात बसत नसल्याने रद्द झाले, तर ९ घाट २ जिल्ह्यांच्या सीमेवर असून या ९ घाटांच्या लिलावाची जबाबदारी इतर जिल्ह्यांकडे सोपविल्याने केवळ ७३ घाटांच्या लिलावाचे आयोजन जिल्हा प्रशासनाने केले होते. जाहीर ७३ घाटांपकी ४१ घाटांचा लिलाव होऊन २ कोटी २६ लाखांचा महसूल जमा झाला. मात्र, यातील ३२ घाटांची अपेक्षित किंमत ४ कोटी ३१ लाख २४ हजार ८९१ रुपये होती. परंतु जाहीर केलेल्या लिलावाप्रसंगी या घाट लिलावाच्या बोलीत प्रशासनाला अपेक्षित महसूल प्राप्त होत नव्हता. त्यामुळे या घाटांच्या अपेक्षित किमतीत २५ टक्के घट व्हावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविला. आयुक्त कार्यालयाने प्रस्तावास मंजुरी दिल्याने आता या ३२ घाटांचा लिलाव १८ फेब्रुवारीपर्यंत होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. या पूर्वी झालेल्या ४१ घाटांच्या लिलावातून २ कोटी २६ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2014 रोजी प्रकाशित
हिंगोलीत ३२ वाळूघाटांच्या किमती लिलावाविना कमी
जिल्ह्यात ९७ पकी ४१ घाटांचा लिलाव पूर्ण झाला, तर ३२ घाटांचा लिलाव न झाल्याने या घाटांच्या अपेक्षित किमती २५ टक्क्यांनी कपात करण्याच्या प्रस्तावास आयुक्त कार्यालयाने मान्यता दिली.
First published on: 04-02-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auction of sand in hingoli