ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत कोपरी येथील प्रभाग क्रमांक ५१ मधून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या नगरसेविका चांदणी भरत दुराणी यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चांदणी दुराणी यांच्याविरोधात काँग्रेसच्या तिकीटावर अॅड अरुणा भुजबळ यांनी निवडणूक लढविली होती. निवडणुकीनंतर भुजबळ यांनी दुराणी यांच्या जात प्रमाणपत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, न्यायालयाने व कोकण विभागीय जात पडताळणी समितीने दुराणी यांचे जात प्रमाणपत्र नुकतेच अवैध ठरविले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 19-12-2012 at 03:20 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bogus cast certificate matter crime against bjp corporator