उन्हाळी सुटय़ांमुळे प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य रेल्वेने ‘ग्रीष्मकालीन विशेष’ गाडय़ांची घोषणा केली आहे. त्यात अमरावती, उधना, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते पटणा, गोरखपूर, वाराणसी, आग्रा कॅट, लखनऊ तसेच पुणे ते लखनऊ यांचा समावेश असून या गाडय़ा एक एप्रिल ते जुलै या कालावधीत धावणार आहेत. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची या गाडय़ांमुळे चांगलीच सोय होणार आहे.
गाडी क्र. ०९०४९ उधना-अमरावती ही एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत दर सोमवारी, मंगळवार व शनिवार रोजी धावणार आहे. उधनाहून ही गाडी सकाळी ११.१५ वाजता सुटेल व अमरावती येथे मध्यरात्री ००.२० वाजता पोहचेल. भुसावळ विभागात ही गाडी जळगाव १८.१०, भुसावळ १८.४०, वरणगाव १९.१४, बोदवड १९.३० , मलकापूर १९.४६, नांदुरा २०.१०, जलंब २०.२२, शेगांव २०.३३, अकोला २१.०५, मूर्तिजापूर २१.२६, बडनेरा २३.५० या स्थानकांवर थांबणार आहे. क्र. ०९०५० ही गाडी दोन एप्रिल ते एक जुलै या कालावधीत अमरावतीहून सकाळी ६.५५ वाजता सुटेल व उधना येथे सायंकाळी १८.३० वाजता पोहचेल. भुसावळ विभागात ही गाडी बडनेरा ७.१०, मूर्तिजापूर ७.४५, अकोला ८.१५, शेगांव ८.४०, जलंब ९.०१, नांदुरा ९.१३, मलकापूर ९.३४, बोदवड ९.५२, वरणगाव १०.०९, भुसावळ १०.३०, जळगाव ११.४० या स्थानकांवर थांबेल. गाडी क्र. ०९५३६ रायपूर-हापा ही गाडी दर मंगळवारी एक एप्रिल ते २४ जून या कालावधीत धावणार आहे. हापाहून २२.०० वाजता सुटणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी भुसावळ विभागातील जळगाव १४.५०, भुसावळ १५.१०, मलकापूर १६.१३, अकोला १७.१५, बडनेरा १९.०७ येथे थांबेल.
गाडी क्र. ०२०५३ दर बुधवारी दोन एप्रिल ते २५ जून या कालावधीत मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून ७.५० वाजता पाटणासाठी सुटेल. ही गाडी मनमाड १२.०३ व भुसावळ १४.०० येथे थांबेल. गाडी क्र. ०२०५४ ही गाडी दर गुरूवारी तीन एप्रिल ते २६ जून या कालावधीत पाटणाहून १३.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनससाठी सुटेल.
भुसावळ ९.१० व मनमाड ११.१० येथे थांबेल. गाडी क्र. ०१०१५ लोकमान्य टिळक टर्मिनस आग्रा कॅट ही गाडी सात एप्रिल ते २३ जून या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर सोमवारी दुपारी १३.२० वाजता सुटेल. ही गाडी नाशिक १७.३०, मनमाड १८.२५, जळगाव १९.५५ भुसावळ २०.३० येईल. क्र. ०१०१६ ही गाडी आग्रा कॅटहून दर मंगळवारी दुपारी १४.४५ वाजता आठ एप्रिल ते २४ जून या कालावधीत मुंबईसाठी सुटेल. भुसावळ ५.२०, जळगाव ६.०५, मनमाड ९.००, नाशिक ९.५५ वाजता ही गाडी येईल. क्र. ०१०२७ वाराणसी ही गाडी दर बुधवारी दोन एप्रिल ते २५ जून या कालावदीत दुपारी १२.२५ वाजता मुंबईहून वाराणसीसाठी सुटेल.
नाशिक १६.२०, मनमाड १७.१२, जळगाव १९.०८, भुसावळ १९.३० येथे ही गाडी थांबा घेईल. वाराणसीहून क्र. ०१०२८ ही मुंबईकडे येणारी गाडी दर शुक्रवारी तीन एप्रिल ते २६ जून या काला़वधीत धावेल. भुसावळ १३.५०, जळगाव १४.३२, मनमाड १६.२२, नाशिक येथे १७.३० वाजता ही गाडी येईल.
क्र. ०२१११ लोकमान्य टिळक टर्मिनसहून लखनऊकडे जाण्यासाठी दर शुक्रवारपासून गाडी उपलब्ध आहे. ही गाडी मनमाड १५.४८, भुसावळ १७.५० थांबेल. क्र. ०२११२ ही गाडी लखनऊहून मुंबईकडे दर शनिवारी पाच एप्रिल ते २८ जून या कालावधीत येईल. भुसावळ येथे ९.०० व मनमाड य़ेथे ११.३५ वाजता ही गाडी थांबेल. क्र. ०१४५१ लखनऊ-पुणे ही गाडी एक एप्रिल ते २४ जून या कालावधीत दर मंगळवारी पुण्याहून रात्री २२.०० वाजता निघेल. मनमाड ३.३० व भुसावळ ६.१० वाजता ही गाडी येईल. लखनऊहून क्र. ०१४५२ ही गाडी तीन एप्रिल ते २६ जून या कालावधीत दर बुधवारी ६.५५ वाजता पुण्याकडे सुटेल. भुसावळ १.२० व मनमाड येथे ३.४५ ही गाडी येईल.
क्र. ०१०४७ ही गाडी गोरखपूरसाठी लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर बुधवारी दोन एप्रिल ते २५ जून या कालावधीत दुपारी १३.२० वाजता सुटेल.
नाशिक १७.३०, मनमाड १८.२५, जळगाव १९.५५, भुसावळ २०.३० याप्रमाणे ही गाडी थांबणार आहे. गोरखपूरहून क्र. ०१०४८ ही गाडी चार ते २७ एप्रिल या कालावधीत दर शनिवारी सकाळी आठ वाजता सुटेल. भुसावळ १३.४०, जळगाव १४.२५, मनमाड १६.३०, नाशिक १७.५५ येथे ही गाडी थांबेल. प्रवाशांनी या जादा गाडय़ांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने मंडल वाणिज्य प्रबंधक विजय नायर यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2014 रोजी प्रकाशित
मध्य रेल्वेच्या ग्रीष्मकालीन विशेष गाडय़ा
उन्हाळी सुटय़ांमुळे प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य रेल्वेने ‘ग्रीष्मकालीन विशेष’ गाडय़ांची घोषणा केली आहे.

First published on: 01-04-2014 at 07:29 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railways summer special trains