पूर्ती सुपर बझारच्या मनीषनगर शाखेचे उद्घाटन रविवारी, १८ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान आणि विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. महापौर प्रवीण दटके आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पूर्ती सुपर बझारचे अध्यक्ष रवी बोरटकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
या बझारमध्ये किराणा, क्रॉकरी, स्टेशनरी, कॉस्मॅटिक, बेकरी, कपडे, खेळणी, भेट वस्तू आदी उत्पादने विपुल प्रमाणात तसेच फळे व ताज्या भाज्या उपलब्ध राहणार आहेत.
साडेआठ कोटींचा हा प्रकल्प आठहजार चौरस फूट जागेवर उभारण्यात आला आहे. यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे अर्थसाह्य़ केले आहे.
ग्राहकांना एकाच ठिकाणी मोकळ्या वातावरणात वस्तूंची खरेदी करता येणार आहे. या बझारमध्ये गृह उद्योगांची उत्पादने राहणार असून यातून मोठी रोजगार निर्मिती झाली आहे, असे बोरटकर म्हणाले. यावेळी पूर्तीचे सचिव राजीव हडप, कोषाध्यक्ष दीपक सप्तर्षी, अविनाश देशमुख, आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm inaugurated purti super bazaar in manish nagar