श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंटच्या व्यवस्थापन तंत्रज्ञान विभागातर्फे (एमबीए) २०१४-१५च्या तुकडीसाठी नुकतेच प्लेसमेंट सत्र आयोजित करण्यात आले. विभागातील व्यवस्थापनाच्या पदवीधर विद्यार्थ्यांना कार्पोरेट कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
या सत्रात सर्वाधिक वेतन ५.०५ लाख रुपये प्रतिवर्ष तसेच सरासरी वेतन २.२५ लाख प्रतिवर्ष दिले जाणार आहे. या कार्पोरेट कंपनीत इन्फोसिस बीपीओ, आयटीसी, व्होडाफोन्स इन्फोसिस, नोकरी डॉट कॉम, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, इंडसलंड बँक, एस अॅन्ड पी कॅपिटल आयक्यू, पिक्स ट्रान्समिशन, टाईम, स्टार युनियन डाईची, जस्ट डायल, पर्सिस्टंट, नोव्हाटच, गोदरेज अॅन्ड बॉईस, एडीसीसी, इन्फोकॅड, स्पेसवूड, असाही इंडिया, मॅप ग्लास, कोटक महिंद्रा बँक, क्रेव्ह इन्फोटेक इत्यादी कंपन्यात विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. महाविद्यालयाची विद्यार्थिना अलईशा दलाल हिला खाडी देशातील एका अग्रणी समूहात आंतरराष्ट्रीय पातळीवर नोकरी मिळाली. काही विद्यार्थ्यांना उन्हाळी इंटर्नशिप व प्रत्यक्ष प्रकल्पासाठी निवडण्यात आले.
या कंपन्यात रिलायन्स सिमेंट, इंडोरामा, मॉईल, डब्ल्यूसीएल, दिनशॉ डेअरी, अंकुर सीड्स, बैद्यनाथ, आयडीबीआय इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे. महाविद्यायातील व्यावसायिक अभ्यासक्रमामुळे मोठमोठय़ा कार्पोरेट कंपन्या आकर्षित होत असून विभागाला एनबीएची अधिस्वीकृती मिळाली आहे. विभागाने दोन वर्षांचा पूर्णवेळ मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) अभ्यासक्रम व मॅनेजमेंटचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2015 रोजी प्रकाशित
रामदेवबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी
श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंटच्या व्यवस्थापन तंत्रज्ञान विभागातर्फे (एमबीए) २०१४-१५च्या तुकडीसाठी नुकतेच प्लेसमेंट सत्र आयोजित करण्यात आले. विभागातील व्यवस्थापनाच्या पदवीधर विद्यार्थ्यांना कार्पोरेट कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
First published on: 27-05-2015 at 08:23 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment opportunities for ramdevbaba engineering students