चांगला संवाद ज्ञानात भर घालतो, असे प्रतिपादन वेब संशोधन सेवा समूहाचे अध्यक्ष सिद्धार्थ सॅमेल यांनी केले. द्वितीय भाषा म्हणून इंग्रजीचे अध्ययन आणि अध्यापन या विषयावरील वार्षिक आंतरराष्ट्रीय संमेलन तुळशीराम गायकवाड पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने आयोजित केले होते. त्यात सिद्धार्थ सॅमेल बोलत होते. इंग्रजी भाषेत माहिती सर्वसाधारण व्यासपीठावरून परस्पर विदित करताना जग अधिक निकट येते, या प्रचितीमुळे इंग्रजीची उपयुक्तता मूल्य समजणे ही काळाची गरज आहे, असे सॅमेल म्हणाले.
भारताची कार्यालयीन भाषा म्हणून इंग्रजीला प्रथम प्राधान्य क्रम लागतो. लागोपाठ पाचव्या संमेलन सहभागी व्याख्यात्यांनी अनुभवाचे व ज्ञानाचे आदानप्रदान केले. मध्य भारतात इंग्रजी भाषेवर वार्षिक आंतरराष्ट्रीय संमेलन घेणारे तुळशीराम गायकवाड पाटील अभियांत्रिकी हे एकमेव महाविद्यालय आहे. यावर्षी संमेलनात ५०० शोधनिबंध सादर करण्यात आले. जगभरातील ३५ प्रतिनिधी आणि भारतातील  ५०० प्रतिनिधींचा समावेश होता. इंग्रजी भाषेची आंतरराष्ट्रीय संघटना टीईएसओएलची अध्यक्ष डॉ. क्रिस्टिन कॉम्बे, या संघटनेचे संयुक्त अरब अमिरातमधील अध्यक्ष रिहाब रजाब, संयुक्त अरब अमिरात येथील मिडलसेक्स विद्यापीठाचे अधिव्याख्याता मिक किंग, सौदी अरेबियातील प्रा. डॉ. इशरत सुरी आणि संयुक्त अरब अमिरातचे अल इन मेन्स कॉलेजचे डॉ. मोहमंद मौहाना या परिषदेला वक्ते म्हणून लाभले. इंग्रजी भाषेचे अध्यापन व अध्ययनातील अर्थपूर्ण अन्वेषणार्थ चर्चा मंडळ निर्माण करणे हे या परिषदेचे ध्येय आहे. संशोधक, विद्यार्थी, शिक्षकांना संभाषणासाठी ही परिषद एक व्यासपीठ ठरावी, अशी अपेक्षा वक्तयांनी यावेळी व्यक्त केली. गायकवाड-पाटील संस्था समूहाचे प्रमुख व संमेलनाच्या सचिव डॉ. अंजली पाटील गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
    डॉ. मोहन गायकवाड, प्रा. शरद पाटील, कर्नल राहुल शर्मा, डॉ. जी.के. आवारी आणि सुलभा पाटील या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. संमेलनाचे समन्वयक दीपान्ती पाल यांनी आभार मानले.