तळोजाजवळील रोहींजण गावातील वीज चोरी पकडल्याने महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड करीत कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
१८ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला असून याप्रकरणी तळोजा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
गावातील शिवदास तांबे हे वीज चोरून वापरत असल्याचे महावितरण कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आल्याने त्यांच्यावर महावितरण विद्युत कायद्यानुसार कारवाई करत ३७४ युनिट वीज वापराचे २६०० रुपयांचे बिल आकारण्यात आले.
या कारवाईमुळे संतापलेल्या तांबे यांचा पुतण्या ऋषीकेश तांबे याने कनिष्ठ अभियंता सचिन पुंड, लाइनमन पाटील आणि साहाय्यक राहुल कांबळे यांना मारहाण केली. तसेच कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत ऋषीकेश तांबेला अटक केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2014 रोजी प्रकाशित
महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यास अटक
तळोजाजवळील रोहींजण गावातील वीज चोरी पकडल्याने महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड करीत कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
First published on: 22-02-2014 at 02:46 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran worker beaten up one arrested