कुस्तीप्रेमींसाठी आशेचा किरण
जिल्ह्य़ात कुस्तीसाठी आधुनिक प्रशिक्षण केंद्र नाही, प्रशिक्षक नाही, महागाईच्या काळात पहेलवानांना दत्तक घेण्यासाठी कोणी पुढे येत नाही, असे चित्र असताना जिल्ह्य़ातील निरंजन निर्मळ या युवकाने राज्यातील कुस्तीप्रेमींच्या ‘युवा स्फूर्ती प्रतिष्ठान’च्या माध्यमातून
कुस्ती क्षेत्रासाठी आशादायी वातावरण निर्माण
करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी नगरमध्ये आधुनिक प्रशिक्षण केंद्र व
राज्यातील मल्लांना दत्तक घेण्याची योजना हाती घेतली आहे.
श्री. निर्मळ मूळचे निर्मळपिंप्री (ता. राहाता) गावचे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ते जिल्हा उपाध्यक्षही आहेत. पुण्यात ते बांधकाम व्यवसाय करतात.
मुंबईतील कुस्तीचे प्रचारक दत्तात्रेय जाधव यांच्या मदतीने त्यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ३० कुस्तीप्रेमींचा गट स्थापन केला आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून १५० मल्ल दत्तक घेण्याची त्यांची योजना

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आहे. संजय जाधव व तात्या इंगळे (मूळ रा. सांगली) या दोघा कोल्हापूरच्या तालमीत सराव करणाऱ्या
मल्लांना दत्तक घेऊन त्यांनी त्याची सुरुवातही केली
आहे.
शिवाय ते नगर शहराजवळ कुस्तीचे आधुनिक प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू करणार आहेत. त्यासाठी औरंगाबाद रस्त्यावर दीड एकर भूखंड घेऊन बांधकामही सुरू केले आहे.
वर्षभरात हे केंद्र सुरु करण्यासाठी निर्मळ प्रयत्नशील आहेत. दत्तक घेतलेल्या पहेलवानांना केंद्रात निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. कुस्ती हा स्फूर्ती निर्माण करणारा मर्दानी खेळ आहे, त्यामुळे केवळ किताब मिळवणारे पहेलवान तयार न करता भावी पिढी तंदुरुस्त असावी यासाठीही प्रतिष्ठानमार्फत प्रयत्न केले जाणार असल्याचे निर्मळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. प्रतिष्ठानमार्फत कॉलेज युवकांसाठी स्पर्धा
परीक्षा मार्गदर्शन केंद्रही सुरु करण्यात
येणार आहे.

TOPICSनगर
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nager innovative training center by yuva spurti partishthan