काठावरचे बहुमत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या युतीने पुन्हा एकदा पुसद नगर परिषदेच्या सर्वच विषय समित्यांवर कब्जा केला. गुरुवारी सकाळी ११ वाजता विषय समितीच्या सदस्यांची यादी दिल्यानंतर दुपारी विषय समित्यांच्या सभापतीपदांची निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. बांधकाम समितीसाठी शिवसेनेचे अ‍ॅॅड. उमाकांत पापीनवार यांनी काँग्रेसचे अशोक उंटवाल, पाणी पुरवठा समिततीसाठी राकाँचे राजू दुधे यांनी काँगेसचे लक्ष्मण वाघमोडे, शिक्षण समितीसाठी राकाँचे प्रा. नामदेव फाटे यांनी काँगेसच्या शुभांगिनी चिद्दरवार, आरोग्य समितीसाठी शिवसेनेच्या वर्षां संतोष दरणे यांनी काँग्रेसच्या अ. समद यांच्यावर ५ विरुध्द ३ मतांनी विजय मिळविला.
महिला व बालकल्याण सभापती राकाँच्या माला सुरेश बिडकर यांची अविरोध निवड झाली. स्थायी समितीवर राकाँचे नीरज पवार, काँग्रेसचे डॉ.मो.नदीम व शिवसेनेच्या चंदाताई गुरूवाणी यांची नावे आहेत. नियोजन समितीवर पदसिध्द अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष डॉ. अकिल मेमन, तसेच नितीन पवार, कैसरखान, पुष्पा डोंगरे, सतीश बयास, अ.समद, अजय पुरोहित, जकी अन्वर, अनिल ठाकुर हे सदस्य आहेत.
डोळस अनुपस्थित होते. सभेला नगराध्यक्ष सीताबाई कांबळे यांच्यासह राकां, शिवसेना व काँगेसचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी वसंत इंगोले, महसूल विभागाचे वामनराव जाधव, व पालिकेचे वरिष्ठ लिपीक उत्तम डुकरे यांनी निवडणूक कार्यक्रमात सहकार्य केले. सर्व सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सेनेने बांधकाम समितीची जबाबदारी पुन्हा एकदा अ‍ॅॅड. उमाकांत पापीनवार यांच्याकडे,  तर    राकाँने    पाणी पुरवठा समितीची जबाबदारी पुन्हा एकदा राजू दुधे यांच्यावर सोपविली आहे, तर अन्य तिन्ही समित्यांमध्ये बदल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sena mastery on subject committee in pusad municipalty