वरळीतील एल. एस. रहेजा टेक्निकल इन्स्टिटय़ूटने फिल्म मेकिंगचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. सहा महिने चालणाऱ्या या डिप्लोमा इन डिजिटल फिल्म मेकिंगमध्ये सहा प्रमुख विषय चित्रपट क्षेत्रात काम करीत असलेले अनुभवी शिक्षक शिकवणार आहेत. सोमवार, २१ ऑक्टोबरपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती देण्यासाठी दादर येथील धुरू सभागृहात बुधवार, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- २४२२३४६७, ९८२००७४५५७.