दुचाकीवर पाणी आणण्यास गेलेल्या युवकाला भरधाव मोटारीने उडवले. यात युवक जागीच ठार झाला, तर अन्य एक जण जखमी झाला. समाधान बाळासाहेब भडके (वय १८, बोरवटी) असे मृताचे, तर िलबराज भडके असे जखमीचे नाव आहे.
हे दोघे दुचाकीवरून (एमएच २४ केएल ५५५३) महापूर येथे पाणी आणण्यास निघाले होते. महापूर पाटीकडे जात असताना मांजरा नदीवरील पुलावर दुचाकीला लातूरकडे येणाऱ्या इंडिकाने (एमएच ४४ ३६१) धडक दिली. या अपघातात समाधान भडके गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. िलबराज भडके याच्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पाणीटंचाईमुळे बोरवटीच्या युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.