नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्ष कार्यालयात पदवीधर मतदार जोडो हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष अजय पाटील तर पदवीधर कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून विदर्भाचे पदवीधर नोंदणी प्रमुख नारायण निकम व प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रकाश गजभिये, दुनेश्वर पेठे, राजू नागुलवार, वेदप्रकाश आर्य, दिलीप पनकुले, जानबा मस्के आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पदवीधर मतदार जोडे अभियान हाती घेतले आहे. त्यांच्या समस्या समजून घेणए, त्याचे निराकरण करणए व त्यांना एकजुट करून त्यांची यथार्थ शक्ती पक्षाच्या पाठिशी व पर्यायाने राष्ट्रनिर्माणासाठी उभी करणए या हेतूने प्रेरीत होऊन काम करण्यासाठी निरायण निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहकार्य करून पक्षाची शक्ती वाढवावी. संचालन शहर सरचिटणीस राजेश कुंभलकर यांनी केले तर शहराध्यक्ष शरद नागदिवे यांनी आभार मानले. देवीदास घोडे, ईश्वर बाळबुधे, महेंद्र भांगे, प्रशांत बनकर आणि महादेव फुके आदी यावेळी उपस्थित होते.