‘लोकसत्ता-ठाणे’ हे ‘लोकसत्ता’चे सहवृत्तपत्र मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर गुरुवारपासून वाचकांच्या भेटीस आले आहे. या सहवृत्तपत्राला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या नव वृत्तसंक्रमणाच्या निमित्ताने वाचकांशी संवाद साधण्यासाठी रविवारी ठाणे आणि डोंबिवली येथे वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये ठाणे आणि डोंबिवलीतील काही मान्यवरांशी गप्पांचा विशेष कार्यक्रमही ठेवण्यात आला आहे. वाचकांना या सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण. या कार्यक्रमांस प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणेच का?
मुंबईचे उपनगर ही ओळख पुसून स्वयंपूर्ण होत चाललेल्या ठाण्याला आता वास्तव्यासाठी पहिला पर्याय म्हणून अनेकांची पसंती मिळू लागली आहे. त्यातील काही मान्यवरांशी गप्पा..  ठाणेच का?
प्रमुख उपस्थिती :
डॉ. अनिल काकोडकर  (ज्येष्ठ वैज्ञानिक), विनय सहस्र्बुद्धे (भाजप नेते), चिन्मय मांडलेकर (अभिनेते-दिग्दर्शक), संजय पवार (लेखक-चित्रकार), मकरंद अनासपुरे (अभिनेते).
स्थळ : दि ठाणे क्लब, रहेजा कॉम्प्लेक्सलगत, तीन हात नाका, ठाणे (प.)
तारीख : १८ जानेवारी
वेळ : सकाळी १० वा.

डोंबिवली :  गाव ते शहर : एक प्रवास
डोंबिवलीतील सांस्कृतिक, सामाजिक बदल पाहिलेल्या आणि अनुभवत असलेल्या डोंबिवलीकरांशी गप्पा.
प्रमुख उपस्थिती :
श्रीपाद तथा आबासाहेब पटवारी  (माजी नगराध्यक्ष),
माधव जोशी (व्यवस्थापन तज्ज्ञ, टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस),
वसंत आजगावकर (ज्येष्ठ गायक),
तेजश्री प्रधान (अभिनेत्री).
स्थळ : सर्वेश सभागृह, टिळक मार्ग, डोंबिवली (पूर्व)
तारीख : १८ जानेवारी    
वेळ : सायं. ५ वा.

वाचक मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिका आजपासून लोकसत्ताच्या ठाणे कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.
पत्ता : लोकसत्ता, ठाणे कार्यालय, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रस्ता, ठाणे (प.),
दूरध्वनी – ०२२ २५३९ ९६०७,

डोंबिवलीतील वाचकांनी निमंत्रणपत्रिकांकरीता  कृपया पुढील क्रमांकावर संपर्क साधावा –
योगेश मोरे, दूरध्वनी –  ९३२२९०६५०९.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers gathering for poeple of thane and dombivli