महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या बेपत्ता विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याचा गुन्हा भद्रकाली पोलिसांनी दाखल केला आहे.
पंचशीलनगरमधील सागर मच्छिंद्र कांबळे (१०) हा विद्यार्थी महापालिकेच्या शाळा क्रमांक सहा मध्ये शिकतो.२४ सप्टेंबर रोजी शाळेत जाण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेला सागर घरी परत आलाच नाही. शोध घेऊनही त्याचा तपास न लागल्याने त्याची काकू मंदा शिंदे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सागरचे आई-वडील तो लहान असतानाच मयत झाल्याने काकू त्याचा सांभाळ करीत आहे.
सागरच्या बेपत्ता होण्याचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला
आहे.