दरवर्षी उन्हाळ्यात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन यंदाही नागपूर-पुणे मार्गावर २६, तर नागपूर- मुंबई मार्गावर २४ समर स्पेशल रेल्वेगाडय़ा चालवण्यात येणार आहेत.
०१०२९ नागपूर- पुणे ही गाडी २८ जूनपर्यंत दर शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुटून शनिवारी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी पुण्याला पोहचेल. तर ०१०३० पुणे- नागपूर ही गाडी २९ जूनपर्यंत दर शनिवारी सकाळी ५ वाजून २० मिनिटांनी पुण्याहून सुटून त्याच रात्री १० वाजता नागपूरला पोहचेल. या गाडीला वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर व दौंड या स्थानकांवर थांबे राहणार असून, तिला सामान्य अनारक्षित श्रेणीचे ८ आणि दोन एसएलआर असे एकूण १० डबे राहतील.
०१०१३ सीएसटी मुंबई- नागपूर ही गाडी २३ जूनपर्यंत दर रविवारी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी मुंबईहून सुटून दुपारी ३ वाजता नागपूरला पोहचेल. परतीच्या प्रवासात ०१०१४ नागपूर- सीएसटी मुंबई ही गाडी रविवारी दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी नागपूरहून सुटून सोमवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी मुंबईला पोहचेल. या गाडीला वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे व दादर या स्थानकांवर थांबे राहणार आहेत. ही गाडी एसी टू टियर-कम- थ्री टियरचा १, एसी टू टियरचा १, एसी थ्री टियरचे २, शयनयान श्रेणीचे १२, सामान्य अनारक्षित श्रेणीचे ५ आणि दोन एसएलआर अशा एकूण २३ डब्यांसह धावेल.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2013 रोजी प्रकाशित
उन्हाळ्यात पुणे, मुंबई मार्गावर समर स्पेशल गाडय़ा धावणार
दरवर्षी उन्हाळ्यात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन यंदाही नागपूर-पुणे मार्गावर २६, तर नागपूर- मुंबई मार्गावर २४ समर स्पेशल रेल्वेगाडय़ा चालवण्यात येणार आहेत.
First published on: 09-04-2013 at 02:50 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer special train in pune mumbai route