सुप्रसिद्ध तबलावादक पं. नाना मुळे यांच्या पंचाहत्तरी आणि संवादिनी वादक संगीतज्ञ डॉ. विद्याधर ओक यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नादब्रम्ह संस्थेच्या वतीने तबला आणि संवादिनीच्या वादनाचा मधुर सोहळा आयोजित केला आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे संस्थेचे सहकार्य असलेला हा कार्यक्रम रविवार २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते १० या वेळात सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे येथे होणार आहे.
तबला आणि संवादिनी वादकांच्या या विशेष सत्कार सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमाचा रसग्रहण रसिकांना करता येणार आहे.
नितीन वारे यांचे तबला वादन, माधव वर्तक आणि मुकुंद मराठे यांची लेहरा साथ असलेले तबला वादन, नाटय़संगीताचा कार्यक्रम वेदश्री ओक, प्राजक्ता मराठे आणि डॉ. कविता गाडगीळ सादर करणार आहेत. धनंजय बेडेकर, आदित्य पानवलकर, श्रीरंग परब, यांची साथसंगत या कार्यक्रमाला असून श्रीराम केळकर या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अखेरीस सत्कारमूर्ती नाना मुळे आणि डॉ. विद्याधर ओक आपले एकत्रित वादन करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2013 रोजी प्रकाशित
तबला संवादिनीचा मधुर सोहळा
सुप्रसिद्ध तबलावादक पं. नाना मुळे यांच्या पंचाहत्तरी आणि संवादिनी वादक संगीतज्ञ डॉ. विद्याधर ओक यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नादब्रम्ह
First published on: 23-11-2013 at 06:43 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tabla programme