राष्ट्रीय आरोग्य विमा योजना राज्यात सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रीय आरोग्य विमा योजना बचाव कृती समितीचे संयोजक पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी पत्रकार परिषदेत केली.
 असंघटित कामगारांसाठी राष्ट्रीय आरोग्य विमा योजना अतिशय फायदेशीर होती, पण ही योजना बंद करण्याची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. या योजनेऐवजी राजीव गांधी जीवनदायिनी योजना राबविली जाईल, असे आश्वासन दिले गेले, परंतु राष्ट्रीय आरोग्य विमा योजना खासगी विमा कंपनीतर्फे चालविण्यात येते आणि ही कंपनी रुग्णांना आरोग्य निधी वाटप करण्यास टाळाटाळ  करते. अशी कारणे दाखवून ही योजना रद्द करण्यात आली. पाच जणांच्या कुटुंबीयांना एका युनिटप्रमाणे सर्व सदस्यांना लाभ घेता येतो. लाभार्थी कुटुंबातील पाच व्यक्तींसाठी जास्तीत जास्त ३० हजार रुपयांची तरतूद होती, पण राष्ट्रीय आरोग्य विमा योजनाच बंद करण्यात आली.
या योजनेकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता १९ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता सीताबर्डीतील व्हरायटी चौकात निदर्शने करण्यात येणार आहेत.