गोंदिया जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे १६ जानेवारीला ठरणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. याकडे जिल्ह्य़ातील नागरिकांसह भाजप कार्यकर्त्यांंचे लक्ष लागले आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपकडे बहुमत असले तरी पक्षांतर्गत गटबाजीवरून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मोच्रेबांधणी सुरू आहे. या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गोंदिया जिल्हा परिषदेतील भाजपचे २८ सदस्य सहलीला सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेले आहेत. ऐन वेळेवर फाटाफुट होऊ नये, यासाठी निवडणुकीच्या एक दिवसाआधी अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याचा निर्णय नागपुरातील गडकरी वाडय़ातून घेण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले. यामुळे सध्या तरी भाजप कार्यकत्रे संभ्रमात आहेत. अडीच वर्षांआधी अध्यक्षपदासाठी माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे सुपुत्र विजय शिवणकर यांचे नाव चच्रेत पुढे होते, मात्र ऐने वेळेवर विजय शिवणकर यांना डावलून नेतराम कटरे यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. यावेळीही या पदासाठी विजय शिवणकर यांना प्रबळ दावेदार समजण्यात येत असले तरी ऐनवेळी भाजप पक्षश्रेष्ठी कुठला निर्णय घेतील, हे सांगता येणे शक्य नसल्याने विजय शिवणकर यांच्यासोबत असलेले ५ जि.प.सदस्यांचा गट वेगळा फुटू नये म्हणून भाजप पूर्ण खबरदारी घेत आहे.
जिल्ह्य़ातील भाजप वर्तुळात माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांची कामगिरी अत्यंत महत्वाची आहे. या सर्व बाबीला अनुसरून, तसेच पक्षांतर्गत गटबाजी लक्षात घेऊन यावेळी अध्यक्षपदासाठी विजय शिवणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे मानले जात आहे, मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून भाजप यावेळी पुन्हा अध्यक्षपदासाठी मतभेदाला सामोरे जाऊन काही नवीन खेळ खेळणार तर नाही, याकडेही लक्ष लागले आहे. याच निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून आमदार नाना पटोले यांच्या गटातून जि.प.चे सदस्य राजेश चतुर यांचेही नाव अध्यक्षपदासाठी पुढे करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त या पदांसाठी जि.प.चे माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन, मोरेश्वर कटरे, मदन पटले ,भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोवार समाजाची सर्वाधिक मते लक्षात घेता समाजाला आकर्षति करण्यासाठी या समाजालाही प्रतिनिधित्व देण्याची चर्चा सुरू आहे. यातील मदन पटले व मोरेश्वर कटरे यांचा अध्यक्षपदासाठी विचार झाला नाही, तर उपाध्यक्षपदासाठी नक्कीच यापंकी एकाचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही पदांची नावे ठरल्यानंतर विषय समित्यांच्या सभापतीची नावे ठरणार असली तरी यासाठी ही आतापासून फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे. सभापतीपदासाठी देवरी तालुक्यातील सविता पुराम, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील किरण कांबळे, गोरेगाव तालुक्यातील सीता रहांगडाले, देवरी तालुक्यातील शिवसेनेचे एकमेव सदस्य राजेश चांदेवार यांचे नाव पुढे येत आहेत. यांच्यापकीच सभापतीची निवड होणार, असा अंदाज वर्तविला जात आहे. सहलीला गेलेले सर्व जि.प.सदस्य आज सायंकाळी नागपूरला पोहोचणार त्यानंतर नागपुरातील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या वाडय़ात गोंदिया जिल्हा परिषदेच्या सर्व पदांसाठी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2013 रोजी प्रकाशित
गोंदिया जि. प.च्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी वर्णी कुणाची?
गोंदिया जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे १६ जानेवारीला ठरणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. याकडे जिल्ह्य़ातील नागरिकांसह भाजप कार्यकर्त्यांंचे लक्ष लागले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-01-2013 at 01:27 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will be on gondiya distrect parishad chairmen and vice chairmen