नितीन मुजुमदार
बीसीसीआयने गेल्या आठवड्यात देशातील महिला क्रिकेटपटूंसाठी एक उत्साहवर्धक घोषणा केली.त्यानुसार आता भारतातर्फे कसोटी, एकदिवसीय आणि टी२० या तिन्हींपैकी कोणत्याही प्रकारामध्ये क्रिकेट खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूस पुरुष क्रिकेटपटू एवढेच म्हणजे कसोटीसाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख तर टी२० साठी तीन लाख रुपये एवढे मानधन देण्यात येईल .या आधी महिला क्रिकेटपटूंना अनुक्रमे कसोटीसाठी अडीचलाख तर टी२० साठी एक लाख रुपये एवढीच रक्कम मिळत होती! हे आकडे पाहाता भारतीय महिला क्रिकेटमध्ये आता येऊ घातलेल्या मोठया स्थित्यंतराची ही नांदी आहे असे म्हणावे लागेल.
आणखी वाचा : SRGMP L’il Champs: रिक्षा चालकाच्या ‘या’ मुलींनी घातलीय संपूर्ण देशाला भुरळ !
२०१७ मध्ये तत्कालीन प्रशिक्षक डब्लू. व्ही. रामन यांच्या कारकिर्दीत भारताने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली,यंदा तर कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सिल्व्हर मेडल नंतर इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये ३/० असा ‘वन डे’ मालिकेतील विजय, बांगलादेशमध्ये आशिया चषक स्पर्धेत जेतेपद असा प्रगतीचा चढता आलेख क्रिकेट रसिक अनुभवत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने उचललेले पाऊल समयोचित म्हणावे लागेल. पुढील वर्षापासून महिला क्रिकेटच्या आयपीएलला देखील सुरुवात होत आहे.
आणखी वाचा : ‘या’ शाळकरी मुली अंतराळात पाठवणार उपग्रह !
बीसीसीआयच्या या ‘गेम चेजिंग’ निर्णयाचे भारतीय कर्णधार हरमनप्रित कौर ने ‘रेड लेटर डे’ अशा शब्दात स्वागत केले आहे. माजी कर्णधार शांता रंगास्वामी म्हणतात,” १९७३ ते १९९४ या माझ्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत मी क्रिकेट खेळून काहीही अर्थप्राप्ती केली नाही” . १९७६ ते १९९३ या दरम्यान भारतासाठी २०कसोटी व ३४ ‘एकदिवसीय’ सामने खेळलेल्या डायना एदुलजी म्हणतात, “ही बातमी म्हणजे खेळाडूंसाठी एक चांगली दिवाळी भेट आहे!” त्यानी स्वतः २०१७ पासून तीन वर्षे बीसीसीआय वर प्रशासक म्हणून काम पाहिले आहे.
आणखी वाचा : आकर्षक ‘अंडरआर्म्स’साठी चक्क मेकअप!
एकंदरीतच भारतीय महिला क्रिकेटसाठी २७ ऑक्टोबर २०२२ हा बीसीसीआयने समान मानधन घोषित केलेला दिवस खूप संस्मरणीय ठरावा. बोर्डाच्या या निर्णयाचे लगेचच मोठे व दूरगामी परिणाम दिसणार नाहीत, कारण अजून बरेच बदल होऊ शकतात व व्हायला देखील हवे आहेत. सध्या केवळ सामन्यांचे मानधन वाढविले आहे,महिला व पुरुष क्रिकेटपटू यांच्या सेंट्रल काँट्रॅक्ट मधील मोठी तफावत अजून कायम आहे, ती दूर व्हायला कदाचित थोडा कालावधी लागेल. कदाचित अपेक्षेपेक्षा अधिक काळही लागेल.
आणखी वाचा : अक्षता मूर्ती आहेत तरी कोण?
सध्या पुरुषांची सेंट्रल काॅट्रॅक्ट ४ ग्रेड्स मध्ये आहे. ए+( सात कोटी रूपये), ए ( पाच कोटी रुपये, बी ( तीन कोटी रुपये) व सी ( एक कोटी रुपये) अशा स्तरांवर ते विभागले गेले आहे. याउलट महिला क्रिकेट मध्ये सेंट्रल काॅट्रॅक्ट मधील सर्वाधिक ए ग्रेड ची रक्कम आहे ५० लाख रुपये ! ज्या अंतर्गत हरमनप्रित कौर, स्मृती मानधना, पूनम यादव, दीप्ती शर्मा व राजेश्वरी गायकवाड या पाच महिला क्रिकेटपटू करारबद्ध आहेत. महिला क्रिकेटला पुरुषांच्या क्रिकेटच्या तुलनेत या बाबतीत खूप मोठी मजल मारायची आहे हे वरील आकडेवारीमधून पुरेसे स्पष्ट होते .
आणखी वाचा : Indian Cricket: दिवाळी संपताच भारतीय महिला संघाला BCCI कडून मोठं गिफ्ट; जय शाह यांनी केली घोषणा
महिला व पुरुष क्रिकेटपटूंचे मानधन समानस्तरावर आणणारा न्यूझीलंड हा पहिला दे, जुलैमध्ये त्यांनी हे बदल सर्वप्रथम केले.महिला क्रिकेटर्सचे आंतरराष्ट्रीय स्तरावर सामने सुद्धा खूप कमी होतात त्यात पुरेशी वाढ झाली तर या बदलांचा खरा व दूरगामी लाभ महिला क्रिकेटपटूंना होईल हे निश्चित. पुढील वर्षी सुरू होणाऱ्या महिलांच्या आयपीएलची आर्थिक गणितं सुद्धा महिला क्रिकेटच्या प्रगतीची वाटचाल कशी असेल या दृष्टीने दिशादर्शक असतील.