माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील इन्फोसिस या अग्रेसर कंपनीचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती आणि त्यांच्या पत्नी प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती या ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत. सुनक पंतप्रधानपदी आल्यानंतर अक्षता मूर्तीं प्रकाशझोतात आल्या आहेत. साहजिकच, अशा वलयांकित व्यक्तीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असेल. आणखी वाचा : महिलांना व्हाईट डिस्चार्ज का होतो? जाणून घ्या किती दिवसापर्यंत डिस्चार्ज होणे सामान्य आहे भारतात जन्मलेल्या ४२ वर्षीय अक्षता मूर्ती यांची संपत्ती आजमितीस १.३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची आहे. स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून २००६ साली त्यांनी एमबीए केलं. लिंक्डइन या सोशल पोर्टलवर अक्षता मूर्ती या द कॅपिटल अँड प्रायव्हेट इक्विटी फर्म कॅटामरान व्हेंचर्स, द जिम चेन डिग्मा फिटनेस, द जंटलमन आऊटफिटर्स न्यू अण्ड लिंग्वूड या तीन कंपन्यांच्या संचालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती उपलब्ध आहे. या सर्व कंपन्या कोणत्या प्रकारचं काम करतात आणि अक्षता यांची त्यातली भूमिका नेमकी कोणती हे जाणून घेऊ. आणखी वाचा : मेंदू तल्लख ठेवणारे हे व्यायाम करून तर पाहा ‘ब्लूमबर्ग बिलियनर्स’च्या आकडेवारीनुसार मूर्तीच्या एकूण संपत्तीमधील म्हणजेच सुमारे १.३ अब्ज डॉलर्समधील काही रक्कम ही वडिलांनी स्थापन केलेल्या सॉफ्टवेअर कंपनी ‘इन्फोसिस’मधील त्यांच्या भागीदारीतून प्राप्त झालेली आहे. २००१ मध्ये इन्फोसिसमधील शेअरहोल्डर असल्याचे त्यांनी सार्वजनिकरित्या जाहीर केल्यानंतर बंगळुरूस्थित या कंपनीच्या शेअर्समध्ये दोन हजार टक्क्यांहून अधिक वाढ झाली. आणखी वाचा : विस्मरणाचा आजार कसा ओळखावा? इन्फोसिसमधील अक्षता मूर्तीचा समभाग हा केवळ ०.९ टक्के असून त्यांच्यासाठी गुंतवणूक नाही तर वडिलांच्या कठोर परिश्रमाचा जिताजागता दाखला आहे आणि त्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. अक्षता मूर्ती यांना २०१५ पासून इन्फोसिस या घरच्या कंपनीतील समभागावर मिळालेल्या लाभांशाची रक्कमच मुळात १२६.६१ कोटी रूपये इतकी असल्याचा अंदाज ‘द गार्डिअन’ या वर्तमानपत्राने व्यक्त केला आहे. आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : मैत्रीच्या पुढची पायरी कोणती ? विशेष बाब म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनी कॅटामरान व्हेंचर्स युके ही खाजगी गुंतवणूक फर्म मूर्ती यांच्या मालकीची असल्याचे पार्लमेंटरी रजिस्टरमध्ये यापूर्वीच अधिकृतपणे जाहीर केले होते. मात्र हे जाहीर करताना त्यात त्यांनी त्यांच्या गुंतवणूकीचा तपशील दिलेला नाही. २०१५ साली ऋषी सुनक खासदार झाल्यानंतर त्यांनी त्या कंपनीतील त्यांच्याकडचा ५० टक्के हिस्सा अक्षता मूर्तींकडे हस्तांतरित केला. लिंक्डइनवरील अक्षता मूर्तींच्या प्रोफाइलनुसार कॅटामरान व्हेंचर्स, डिग्मा फिटनेस, न्यु अँड लिंग्वूड या तीन कंपन्यांच्या त्या संचालक आहेत. तसंच क्लेरमॉंट मॅकेन्ना कॉलेजच्या त्या विश्वस्त आहेत. आणखी वाचा : काय आहे स्मृती मानधनाचा डाएट प्लान? कॅटामरान व्हेंचर्स ही मूर्ती कुटुंबाची बंगळुरूस्थित मुख्य गुंतवणूक कंपनी असून भारतभरात नियुक्त १५ कर्मचाऱ्यांच्या मदतीने ती कंपनी इ –स्पोर्ट्स, विमा आणि एलॉन मस्क यांच्या एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज् कॉर्पोरेशन मध्ये गुंतवण्यात आलेल्या एक दशलक्ष डॉलर्सपेक्षाही अधिक रकमेच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवून असते. लिंक्डइन प्रोफाइलनुसार मूर्ती मे २०१३ पासून कॅटामरानच्या संचालकपदी आहेत. शिवाय कंपनीच्या ब्रिटनमधील शाखेच्या त्या एकमेव संचालक आणि समभागधारक आहेत. या कॅटामरान कंपनीची कार्यालये लंडन आणि बंगळुरूमध्ये आहेत. युकेमधील स्थानिक ब्रॅण्डसना पतपुरवठा करणे, व्यवस्थापकीय तज्ज्ञता पुरवणे आणि नियोजनबद्ध विकासासाठी भागीदारांचे जाळे विणणे यावर त्यांचा भर आहे. लिंक्डइन प्रोफाइलमधील तपशीलानुसार कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करावयाचा आहे. आणखी वाचा : फोर मोअर शॉट्स – तिसऱ्या पर्वात महिलांची लैंगिकता, सेक्स आणि बरंच काही… कॅटामरानच्यामार्फत युकेमधील डिग्मा फिटनेस, जेमीज् इटालियन, जेमीज् पिझेरिया, न्यू अण्ड लिंग्वूड, सॉरोको आणि वेन्डीज् अशा किमान सहा कंपन्यांमध्ये मूर्तींचा सहभाग आहे. डिग्मा फिटनेस आणि न्यू अँड लिंग्वूडमध्ये तर त्या संचालकपदीच आहेत. ह्यू सलोनच्या माध्यमातून भारतामध्ये सुरू होणाऱ्या वेंडीज् रेस्तरॉं साखळीसाठी त्यांनी ब्रिटीश हेज फंड मॅनेजरमधे वेंडीज् च्या वाढीसाठी गुंतवणूक केलेली आहे.