दररोज थकवणारा सराव करण्यापेक्षा तीन दिवसांचा थोडा, पण अर्थपूर्ण सराव महत्त्वाचा आहे, असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले. भारतीय संघाच्या अनियमित सराव सत्रांमुळे ऑस्ट्रेलियातील अनेक जण चकित झाले आहेत. भारतीय संघाने चारपैकी दोनच दिवस सराव केला.
‘‘आम्ही आमच्या सरावाचे विभाजन केले आहे. तीन दिवसांचा अथक सराव, सहा दिवसांच्या रूक्ष सरावापेक्षा चांगला ठरतो,’’ असे धोनीने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, ‘‘सात आठवडय़ांमध्ये पसरलेल्या विश्वचषकात खेळाडू मानसिकदृष्टय़ा ताजेतवाने राहण्याची आवश्यकता आहे. जेव्हा सातत्याने क्रिकेट खेळले जाते त्या वेळी सराव सत्रांपेक्षा विश्रांती महत्त्वाची ठरते. सराव आणि विश्रांती यांचा योग्य मेळ घालण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2015 रोजी प्रकाशित
अर्थपूर्ण सराव महत्त्वाचा -धोनी
दररोज थकवणारा सराव करण्यापेक्षा तीन दिवसांचा थोडा, पण अर्थपूर्ण सराव महत्त्वाचा आहे, असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले.

First published on: 03-03-2015 at 05:05 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Being mentally fresh is very important says ms dhoni