लवचितकता हे मुंबईचा गुणी फलंदाज अजिंक्य रहाणेचे बलस्थान आहे. त्यामुळे संघासाठी तो कोणतीही जबाबदारी तो लिलया पेलतो, अशा शब्दांत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याचे कौतुक केले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या स्फोटक शतकाप्रमाणेच रहाणेने ६० चेंडूंत साकारलेली ७९ धावांची खेळी ही तितकीच महत्त्वाची होती, असे धोनीने सांगितले.‘‘ट्वेन्टी-२०, एकदिवसीय किंवा कसोटी क्रिकेट असो, रहाणेच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. तो कोणत्याही नव्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असतो,’’ असे धोनीने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘रहाणेच्या फलंदाजीला अचूक समयसूचकतेची देणगी लाभली आहे. क्षेत्ररक्षकांमधील रिकाम्या जागा भेदून फटके खेळण्यात तो वाकबदार आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2015 रोजी प्रकाशित
लवचिकता हे रहाणेचे बलस्थान -धोनी
लवचितकता हे मुंबईचा गुणी फलंदाज अजिंक्य रहाणेचे बलस्थान आहे. त्यामुळे संघासाठी तो कोणतीही जबाबदारी तो लिलया पेलतो,
First published on: 24-02-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flexibility is rahane key strength says dhoni