Adani Wilmar Share Listing: अडाणी ग्रुपची एफएमजीसी (फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स) कंपनी अदानी विल्मर आज, मंगळवारी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली. एनएसईमध्ये या कंपनीचा आयपीओ आपल्या जारी केलेल्या किमतीच्या १२ रुपये वर लिस्ट झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या एफएमजीसी कंपन्यांपैकी एक, अदानी विल्मरचा आयपीओ २७ ते ३१ जानेवारी दरम्यान आला होता. त्याला १७.३७ पट अधिक बोली लागल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीओला सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. तथापि, त्याचवेळी बाजारातील अस्थिरतेमुळे यावर थोडाफार परिणाम झाला. आयपीओसाठी सर्वाधिक बोली गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीतून आली, ज्यांनी त्यांच्या वाटप केलेल्या कोट्यापेक्षा ५६.३० पट अधिक बोली लावली. दुसऱ्या क्रमांकावर शेअरहोल्डर कोटा होता, ज्याला ३३.३३ पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले.

करोना काळात अथक मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘या’ कंपनीची खास भेट; केली मोठी घोषणा

लिस्टिंगनंतर अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. लिस्टिंगच्या अर्ध्या तासानंतर, शेअर्स २० रुपयांनी वाढताना दिसले. हा स्टॉक रु.२५० च्या आसपास ट्रेड करत आहे. कंपनी आयपीओकडून प्राप्त झालेल्या रकमेपैकी १,९०० कोटी रुपये भांडवली खर्चासाठी वापरण्यात येणार आहेत. तर, कंपनीवरील कर्ज कमी करण्यासाठी सुमारे १,०५८.९ कोटी रुपये वापरले जातील आणि उर्वरित ४५० कोटी रुपये धोरणात्मक अधिग्रहण आणि इतर गुंतवणूक संधींवर खर्च केले जातील.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adani wilmer listed on the stock exchange rapid rise in company shares pvp