करोना महामारीच्या काळात अनेक कंपन्यांनी नोकर कपात केल्यामुळे बहुतेकांचे रोजगार गेले. म्हणूनच मागील दोन वर्षे सर्वांसाठीच कठीण गेली आहेत. परंतु अशी एक कंपनी आहे जी आपल्या कर्मचाऱ्यांना, या करोना महामारीच्या काळात कंपनीसाठी काम केल्याबद्दल भेट देत आहे. भेट म्हणून ही कंपनी सर्व कर्मचाऱ्यांना ४ दिवसांच्या कॉर्पोरेट सुट्टीवर घेऊन जात आहे. कार्डिफ स्थित योल्क रिक्रुटमेंट या कंपनीने जाहीर केले आहे की कंपनीच्या सर्व ५५ कर्मचाऱ्यांना उत्तर-पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून दूर असलेल्या स्पेनच्या जाणारी बेटांमधील सर्वात मोठ्या टेनेरीफ येथे एप्रिलमध्ये घेऊन जाणार आहेत.

कंपनीने लिंक्डइनवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे, “योल्क फोक टेनेरीफसाठी रवाना झाले आहे. तिथे फक्त शीर्ष बिलर्स किंवा आमच्या २०२१ च्या ऐतिहासिक निकालांमध्ये ज्यांनी भूमिका बजावली तेच नाही तर इतर सर्वजण आहेत.”

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

वडिलांचा आकस्मिक मृत्यू आणि घराची दयनीय स्थिती; अशा परिस्थितीतही ‘ही’ मुलं करत आहेत कौतुकास्पद कामगिरी

आपल्या कर्मचाऱ्यांना अशाप्रकारची सुट्टी देणारी योल्क रिक्रुटमेंट ही कार्डिफ स्थित पहिली कंपनी असू शकते, असे या कंपनीने म्हटले आहे. तसेच, कंपनी म्हणते, आम्ही अंतर्गत आणि बाह्यरित्या जे काही करतो त्यामध्ये उज्ज्वल, बोल्ड आणि उत्कृष्ट होण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकजण जिंकेल अशी संस्कृती निर्माण करणे कंपनीचे उद्दिष्ट आहे. याचाच अर्थ असा की सर्वसमावेश कॉर्पोरेटेड सुट्टीच्या वेळी कोणीही मागे राहू शकत नाही.”

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, या सुट्टीच्या चार दिवसांच्या विश्रांतीसाठी १००,००० पाउंड म्हणजेच अंदाजे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येईल असा कंपनीचा अंदाज आहे.

योल्कचे मुख्य व्यावसायिक अधिकारी पवन अरोरा म्हणाले, “२०२० हे वर्ष आमच्या संपूर्ण उद्योगासाठी अत्यंत कठीण काळ होता. आम्ही जॉब मार्केट मधुन ओव्हरड्राइव्हमध्ये गेलो. आमचे कर्मचारी रिमोट वर्किंग ते हायब्रीड असा प्रवास करत आहेत. म्हणूनच मागील दोन वर्षांसाठी आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद म्हणायचे आहे.”

रेल्वे रुळांमध्ये दगड का टाकले जातात माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक कारणे

या रिपोर्टमध्ये ब्रिटनमधील अधिकृत आकडेवारीचे सर्वात मोठे स्वतंत्र उत्पादक असलेल्या ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सचे आकडे देखील सादर केले आहेत. यात असे सांगण्यात आले आहे की ऑक्टोबर २०२१ मध्ये १.१७ दशलक्ष नोकऱ्या उघडल्या ज्या साथीच्या रोगाच्या आधीच्या तुलनेत सुमारे ४ लाख अधिक आहेत.

गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर दरम्यान, सुमारे २२ लाख लोकांनी नवीन नोकऱ्या सुरू केल्या, जे बाजारात सामान्य स्थितीत परत येण्याचे संकेत देते. योल्क रिक्रूटमेंटने त्याच लिंक्डइन पोस्टमध्ये नवीन रिक्त जागा देखील जाहीर केल्या आहेत.