Gold-Silver Price on Friday, 7 October 2022 In Maharashtra. | Loksatta

Gold-Silver Price on 7 October 2022: ग्राहकांच्या चिंतेत भर; सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ; जाणून घ्या आजचे दर

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Gold-Silver Price on 7 October 2022: ग्राहकांच्या चिंतेत भर; सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ; जाणून घ्या आजचे दर
आजचा सोने-चांदीचा भाव (फोटो: Financial Express)

Gold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६२,००० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,८५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,२०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,२३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१५ रुपये आहे.

Petrol-Diesel Price on 7 October 2022: पेट्रोल-डिझेलच्या दरातील चढ-उतार कायम; तुमच्या शहरातील किंमत जाणून घ्या

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

विश्लेषण : सोन्याची किंमत ठरते कशी? नेमके कोणते घटक ठरतात कारणीभूत? जाणून घ्या सविस्तर!

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘सेन्सेक्स’ची १५६ अंशांनी आगेकूच

संबंधित बातम्या

आयडीबीआय बँकेचे खासगीकरण; खरेदीदारांच्या बोलीला मुदतवाढ शक्य
मालमत्ता तारण कर्ज
जीएसटी: ‘हॉटेल, रेस्तराँमधील खाद्यपदार्थांचे दर कमी करा’
तेजीचा रथ अविरत ‘सेन्सेक्स’ची ६३० अंशांनी कूच
स्टेट बँकेचे थकीत कर्ज खाते ‘आदित्य बिर्ला एआरसी’कडे हस्तांतरित

व्हिडिओ

ताज्या बातम्या
FIFA World Cup 2022: ब्राझीलच्या पराभवानंतर संघात अस्वस्थता प्रशिक्षक टिटे यांनी घेतला मोठा निर्णय
नेयमार मैदानात कधीच दिसणार नाही? FIFA World Cup मधून ब्राझील अनपेक्षितरित्या बाहेर पडल्यानंतर म्हणाला, “हा शेवट आहे असं…”
“हे अकलेचे कांदे…”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा टोला; म्हणाले, “तुमच्या तिजोरीत येणारे पैसे…”
IND vs BAN 3rd ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पुण्यात ५१ पादचारी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव धूळ खात