रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. इसिसच्या नावाने अशा धमकीचा ई-मेल राजन यांना त्यांच्या कार्यालयीन मेलवर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या धमकीतील मजकूर मुंबई पोलिसांनी अद्याप जारी केला नसला तरी पाठविणाऱ्याच्या ई-मेल पत्त्यावरून तपास सुरू केला आहे. इसिस ही एक दहशतवादी संघटना मानली जाते.
डॉ. रघुराम राजन सध्या अमेरिका दौऱ्यावर असून अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर ते जागतिक बँकेच्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
राजन यांचे छायाचित्र व नाव वापरून काही महिन्यांपूर्वी ‘फिशिंग मेल’ जारी होत होते. मात्र याच्याशी आपला संबंध नसल्याचे गव्हर्नरांनी स्पष्ट केले होते. जागतिक बँकेचा हवाला देत याबाबतच्या मेलद्वारे पैसे जमा करण्यास सांगण्यात येत होते. त्यानंतर गेल्याच आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेचे बोधचिन्ह वापरून विविध बँकांच्या खात्यातील शिलकीची माहिती देणाऱ्या अ‍ॅपचा प्रसार सोशल नेटवर्कवरून होत होता. अशा अ‍ॅप बाबत दक्षतेचे आवाहनही रिझव्‍‌र्ह बँकेकडून अलीकडेच करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi governor raghuram rajan gets threat mail from isis security beefed up